google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...सांगोला-जत रोडवरील सोनंदजवळ अपघात मालट्रकच्या धडकेत आई ठार; अडीच वर्षांची चिमुकली जखमी

Breaking News

धक्कादायक...सांगोला-जत रोडवरील सोनंदजवळ अपघात मालट्रकच्या धडकेत आई ठार; अडीच वर्षांची चिमुकली जखमी

 धक्कादायक...सांगोला-जत रोडवरील सोनंदजवळ अपघात


मालट्रकच्या धडकेत आई ठार; अडीच वर्षांची चिमुकली जखमी

सांगोला : चालकाचा भरधाव मालट्रकवरील ताबा सुटल्याने विवाहकार्य उरकून घराकडे जाण्यास रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मायलेकीस जोराची धडक दिली. 

अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर तिची लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात बुधवार, ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास

 सांगोला - जत रोडवरील सोनंद (पिंपरी मळा) येथे घडला. दीपाली श्रीकांत बाबर (वय २९, रा. डोंगरगाव, ता. सांगोला) असे मृत महिलेचे नाव आहे. हिंदवी श्रीकांत बाबर (वय अडीच वर्षे) असे जखमी बालिकेचे नात आहे

श्रीहरी भाऊसोकाशीद (रा. सोनंद) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी चालक सोमनाथ निवृत्ती जाधव (रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादी श्रीहरी काशीद यांची डोंगरगाव येथील बहीण दीपाली बाबर व तिची लहान मुलगी

 हिंदवी बाबर या दोघी मायलेकी मंगळवार, २ जानेवारी रोजी सोनंद येथे लग्नकार्यासाठी गेल्या होत्या. लग्न उरकून डोंगरगावला जाण्यासाठी सांगोला ते जत जाणाऱ्या रोडवरील पिंपरी मळा येथे रस्त्याच्या कडेला त्या थांबल्या होत्या.

 त्यादरम्यान जतकडून सांगोल्याकडे भरधाव येणाऱ्या एमएच १२ एलटी ००३६ या मालट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात याला

Post a Comment

0 Comments