क्रांतीज्योती सावित्रीमाई मुळेच आजच्या महिलांना उच्च शिक्षण घेता येत आहे...दिपाली पाटील..
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
क्रांतीज्योती सावित्रीमाई मुळेच आजच्या मुलींना उच्च शिक्षण घेता येत आहे आज मी केवळ महिला शिक्षक म्हणून काम करीत आहे
त्याचे संपूर्ण श्रेय क्रांतीज्योती सावित्रीमाईंना आहे आपण आपल्या मुलीला चांगले चांगले शिक्षण मिळवून देणे ही सावित्रीमाईंना आदरांजली असेल असे
मत दिपाली पाटील मॅडम यांनी व्यक्त केले. शहीद जवान संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती नेहरू चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्री माई यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेविका शोभाताई फुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सांगोला अर्बनचे शहर मॅनेजर दत्तात्रय नवले यांची होती कार्यक्रमाप्रसंगी
माजी नगरसेविका शोभाताई फुले यांच्या शुभहस्ते महिला शिक्षक दिनानिमित्त आरती जाधव,मँडम थोरात मॅडम ,दिपाली पाटील मॅडम यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा देण्यात आल्या
कार्यक्रमाप्रसंगी धनाजी शिर्के, आराध्य कलेक्शनचे मालक श्री लिगाडे ,अजित जाधव इत्यादी मान्यवर व शहीद जवान संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments