google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा .आ. दीपक आबा साळुंखे -पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अकोला येथे दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी पार पडल्या .

Breaking News

मा .आ. दीपक आबा साळुंखे -पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अकोला येथे दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी पार पडल्या .

 मा .आ. दीपक आबा साळुंखे -पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अकोला येथे दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी पार पडल्या . 


   (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा. समाधान दादा काळे (महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रा.मारुती जाधव 

(प्रसिद्ध वक्ते) . मा . अँड . महादेव कांबळे. ( जिल्हा प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) . मा. डॉ.पियुष दादा साळुंखे पाटील ( युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) .  यशराजे साळुंखे -पाटील .

मा.अनिल नाना खटकाळे (तालुका अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी). प्राध्यापक मा. नानासाहेब लिगाडे( माजी चेअरमन शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोला). मा. अशोक( भाऊ) शिंदे (मा.जि.प.सदस्य). सरपंच ,उपसरपंच, 

आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य , सोसायटी चेअरमन, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण खटकाळे सर यांनी केले असून वरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना वक्तृत्व स्पर्धेचे महत्त्व सांगितले.    

         या वक्तृत्व स्पर्धेसाठी 32 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा .नष्टे सर, मुंढे सर ,लांडगे सर यांनी काम पाहिले .

तसेच  या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संकेत कृष्णात पाटील .(गडहिंग्लज) कोल्हापूर 7601  रु. (सरपंच सौ.मनीषा सुरवसे) व ग्रामपंचायत सदस्य महादेव शिवाजी शिंदे 

यांचे तर्फे) . द्वितीय क्रमांक  प्रणिती राजेंद्र पवार (आटपाडी ) 6601रु.( शंकर शेठ शिंदे .सिद्धनाथ ज्वेलर्स अकोला यांचे तर्फे). तृतीय क्रमांक ऋषी भारत पैलवान  

(सांगोला ) 5601रु.( तानाजी शिंदे सोसायटी चेअरमन अकोला यांचे तर्फे).तसेच चतुर्थ क्रमांक सानिका नवनाथ शिंदे (वाळेखिंडी) 4601रु.( गणेश शिंदे उपसरपंच अकोला यांचे तर्फे )यांनी पटकावला . 

विजेत्यांना ट्रॉफी व सन्मानपत्र विजयकांत महादेव खटकाळे( मा.सरपंच अकोला) यांनी दिले .या  वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक उद्योगपती योगेश दादा खटकाळे यांनी केले . 

तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अकोल्या गावची कन्या कु. हर्षदा औदुंबर गव्हाणे  सर हिची (ASO) वर्ग 2.या पदी निवड झाल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला तसेच गणेश शिंदे उपसरपंच अकोला यांचे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला 

.आभार प्रदर्शन नंदू भाऊ शिंदे यांनी केले कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व ग्रामपंचायत  आजी माझी सरपंच, सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, सदस्य ग्रामपंचायत व सोसायटीचे आजी-माजी सदस्य ,

पदाधिकारी, बाबासाहेब लिगाडे रमेश नकाते, हनुमंत गोडसे ,नाना गोडसे, पदाधिकारी , यांनी सहकार्य केले .कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल संयोजक योगेश दादा खटकाळे सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments