google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...सांगोल्यात सव्वालाखाला दोन लाख दिले.. नंतर ७६ लाख गुंतवून अडकले शेअर मार्केटमधून २० टक्क्यांचे आमिष; पिता-पुत्रांनी घातला ५१ लाखांचा गंडा ! दोघांवर गुन्हा दाखल

Breaking News

खळबळजनक घटना...सांगोल्यात सव्वालाखाला दोन लाख दिले.. नंतर ७६ लाख गुंतवून अडकले शेअर मार्केटमधून २० टक्क्यांचे आमिष; पिता-पुत्रांनी घातला ५१ लाखांचा गंडा ! दोघांवर गुन्हा दाखल

 खळबळजनक घटना...सांगोल्यात सव्वालाखाला दोन लाख दिले.. नंतर ७६ लाख गुंतवून अडकले शेअर


मार्केटमधून २० टक्क्यांचे आमिष; पिता-पुत्रांनी घातला ५१ लाखांचा गंडा ! दोघांवर गुन्हा दाखल

सांगोला : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास तुम्हाला प्रचंड पैसा मिळवून देतो असा विश्वास देऊन गुंतवलेल्या रकमेपैकी ५१ लाख २० हजार रुपये रकमेचा परतावा न करता पिता-पुत्रांनी सांगोला येथील गुंतवणूकदाराची फसवणूक केली.

 त्यांनी एवढ्यावरच न थांबता गुंतवणूकदारास अरेरावीची भाषा वापरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून गुंतवलेल्या पैशाची मागणी केल्यास तुमची काही खैर नाही, अशी दमदाटी केली. 

याबाबत राजेश बंडा माळी, रा. मस्के कॉलनी, सांगोला यांनी प्रतीक पांडुरंग कुलकर्णी व पांडुरंग सर्वोत्तम कुलकर्णी, रा. उस्मानाबाद या पिता-पुत्राविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे, प्रतीकच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राजेश माळी यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची गुंतवणूक केली.

त्याने त्यांना विश्वासात घेण्याकरता २५ हजार रुपयांसह ५ हजार रुपये नफा परतावा म्हणून त्यांना परत दिला. त्यानंतर त्यांचा विश्वास बसल्याने पुन्हा त्यांनी १ लाख २५ हजार रुपये त्यास पाठवले. 

त्यावरही प्रतीकने सुरुवातीला ८ महिने आश्वासनाप्रमाणे गुंतवणूक केलेल्या

रकमेपोटी २० टक्केप्रमाणे नफा परताव्यासह दोन लाख रुपये देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर राजेश माळी यांनी ११ ऑक्टोबर

२०२१ ते २ फेब्रुवारी २०२२ यादरम्यान ७६ लाख ५० हजार रुपये प्रतीक कुलकर्णी याच्या भूम, जि.उस्मानाबाद येथील आयडीबीआय व

बार्शी, जि. सोलापूर येथील एसबीआय बँक खात्यावरती पाठवले.

दरम्यान, गुंतवलेल्या रकमेवर पाच महिन्यांत त्याने २३ लाख २५ हजार रुपये परतावा म्हणून त्यांच्या खात्यावर पाठवले. परंतु, राजेश माळी यांनी गुंतवलेल्या एकूण ७६ लाख ५० हजार

 रुपयेपैकी प्रतीककुलकर्णी याच्याकडून ५१ लाख २० हजार रुपये अद्यापपर्यंत त्याच्याकडून मिळाले नाहीत म्हणून व त्यांनी त्यास वेळोवेळी त्याच्यामोबाइलवर संपर्क साधून गुंतवलेली रक्कम परत मागितली 

असता दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून प्रतीक कुलकर्णी व पांडुरंगकुलकर्णी यांनी रक्कम परत देण्यास चालढकल करून फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

शिक्षणासाठी लातूरला गेलेल्या मुलांच्या सांगण्यावर फसले

राजेश माळी यांचा मुलगा अजित हा नीटच्या तयारीसाठी लातूर येथे सन २०१९ मध्ये शिक्षण घेत होता. त्या ठिकाणी त्याची प्रतीक पांडुरंग फुलकर्णी याच्याशी ओळख झाली.

 त्यावेळी प्रतीकने अजित यास शेअर मार्केटच्या बिझनेसमध्ये मी प्रचंड पैसे मिळवल्याचे त्यास सांगितले. याबाबत अजितने वडील राजेश माळी यांना सांगून प्रतीकचे फोनवरून बोलणे करून दिले.

तरनंतर प्रतीक व राजेश माळी यांची २०२० मध्ये प्रत्यक्षात भेट झाली. त्यामध्ये त्याने त्याच्यामार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याची त्यांना गळ घालून

 तुम्ही गुंतवलेल्या पैशावरती २० टक्केप्रमाणे नफा मिळेल व तुम्हीं गुंतवलेली रक्कमही तुम्हाला परत मिळेल अशी ग्वाही दिली. त्यानंतर पैसे गुंतवून फसल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments