google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी मनोज घाडगे तर शहराध्यक्ष पदी मोहसिन तांबोळी यांची निवड.

Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी मनोज घाडगे तर शहराध्यक्ष पदी मोहसिन तांबोळी यांची निवड.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी मनोज घाडगे तर  शहराध्यक्ष पदी मोहसिन तांबोळी यांची निवड.


 पुणे येथे युवक पदाधिकारी मार्गदर्शक मेळावा युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी हा  मेळाव्या आयोजित केला होता त्या प्रसंगी ऊर्जा स्त्रोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत


 हा मेळावा पार पडला या मेळाव्याप्रसंगी आदरणीय पवार साहेब म्हणाले सध्या महाराष्ट्रात कोणकोणत्या पक्षात जातो याचा विचार न करता ही निवडणूक युवकांनी हाती घेतली की मोठा बदल होऊ शकतो. 

सत्ता येथे सत्ता जाते. सत्ता नसताना संघर्ष करणे व सत्ता असताना केलेल्या संघर्ष डोळ्यासमोर ठेवून लोकहित साठी कामे करणे यालाच राजकारण म्हणतात व येत्या विधानसभा निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नवे चेहरे विधानसभा निवडणुकी मध्ये निवडून

 विधानसभेत पाठवणार आहे  युवकांनी संधीचे सोने कसे करता येईल याकडे आपले नेतृत्व दाखवून सिद्ध करावे. त्याचप्रमाणे पक्षाचे प्रदेशअध्यक्ष मा.जयंतजी पाटील साहेब  यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश उपअध्यक्षा जयमाला ताई गायकवाड

 यांच्या शिफारशीवरून युवकांचे ऊर्जा स्त्रोत आदरणीय  शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तालुक्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे या करिता सांगोला तालुका अध्यक्ष मा. मनोज घाडगे व शहर अध्यक्ष मोहसीन तांबोळी याची नियुक्तीपत्र देऊन निवड केली

 या प्रसंगा वेळी राष्ट्रवादी पक्षाचे अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी केले

 आदरणीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा जयंत पाटील साहेब,मा .एकनाथजी खडसे साहेब ,मा .अनिल देशमुख साहेब, मा. शशिकांत शिंदे साहेब, ,मा.आ.सुमनताई पाटील, मा.आ.संदीप क्षीरसागर,मा.आ.अरुण लाड साहेब या मान्यवरासह राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट। :-   आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आमचे दैवत आहेत साहेबांचे सांगोला तालुक्यावर विशेष प्रेम आहे साहेबांचे नेतृत्व हे देशाला दिशा देणारे आहे साहेबांचे विचार तळागाळात पोहोचवणे यासाठी आम्ही कटिबंध आहे 

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपअध्यक्षा जयमलाताई गायकवाड

सांगोला शहरांमध्ये येत्या काळात देशाचे नेते युवकांचे ऊर्जा स्त्रोत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्हेण्याचे

 काम करण्याचे प्रयत्न करेन व त्याचबरोबर येत्या काळात नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलने उपोषण करावे लागले तर मागे हटणार नाही

 नूतन युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष 

मोहसीन तांबोळी

Post a Comment

0 Comments