मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मधील विजयाचा सांगोल्यात जल्लोष जनतेने ठरवलंय…२०२४ मध्ये पुन्हा भाजपचेच सरकार येणार – चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (तालुका प्रतिनिधी): देशाला विश्वगुरू करण्याच्या स्वप्नाने प्रेरित होत सातत्यानं विकासासाठी प्रयत्नरत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर लोकांचा आजही विश्वास आहे,
याचे प्रतीक म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीतील विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला विकासाचा मंत्र दिला आहे.
जनतेने ठरवले असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचेच सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांनी व्यक्त केला आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीतील विजयाचा सांगोल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले
की, ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेने भाजपला स्वीकारलं आहे. कल्याणकारी योजना, आरोग्य सुविधा, लोकांच्या मनातील विषयांना हात घालत भाजपनं देशाची वाटचाल महासत्तेकडं केली आहे.
विधानसभा निवडणुकीतील हा विजय केवळ सुरुवात आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पूर्णपणे सफाया मतदार केल्याशिवाय राहणार नाही.
केंद्र सरकारनं गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. विकासाला प्राधान्य दिलंय. त्यामुळं मतदारांनाही भाजपच हवीय यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याचं चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथे भाजपचे सबका साथ, सबका विकास… या भावनेचा विजय झाला आहे. विकसित भारताच्या आवाहनाचा विजय झाला आहे.
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला आहे. इमानदारी, पारदर्शकता आणि सुशासनचा हा विजय आहे असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी नवनाथ पवार, मानस कमलापूरकर,
प्रवीण जानकर, प्रसाद फुले, संजय केदार, विजय इंगवले, सिध्देश्वर गाडे, संजय गव्हाणे, सुरेश बुरांडे, समाधान भालके, अनिल वाघमोडे,
सोयजित केदार, दीपक केदार, ओंकार चौगले, अक्षय डांगरे, अभिजीत केदार, रोहित सावंत, आकाश सावंत, संतोष भालके, किरण केदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments