खळबळजनक घटना... 8 वर्षाच्या बालिकेवर तिघांचा सामूहिक लैंगिक अत्याचार!
बीड — घरातील भंगार विकण्यासाठी जात असलेल्या आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने रस्त्याच्या कडेला असलेल्या पडीक रूम मध्ये घेऊन जात
तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बालेपीर भागात घडली. दरम्यान या प्रकरणातील तीनही आरोपी विधी संघर्ष ग्रस्त आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बालेपीर भागातील आठ वर्षाची बालिका आपल्या घरातील भंगार दुकानावर घेऊन जात असताना तिघा जणांनी तिला
रस्त्यात अडवून बळजबरीने रस्त्याच्या बाजूला असलेल्या पडीक रूम मध्ये घेऊन जात तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना
बालेपीर भागात 3 डिसेंबर रोजी 5 सुमारास घडली.दरम्यान पीडित बालिकेने आरडाओरडा केल्यामुळे तेथून जात असलेल्या एका इसमाने घटना काय घडत आहे हे पाहण्यासाठी पडीक रूमचा दरवाजा वाजवला.
पीडीतेची सुटका करून तिला तिच्या घरी नेऊन सोडले. या घटनेची माहिती ऑटो रिक्षा घेऊन गेलेल्या तिच्या वडिलांना फोनवरून सांगितली गेली. घटनेची माहिती कळताच पिडीत मुलीचे वडील तात्काळ घरी गेले.
घाबरलेल्या मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने घडलेली सर्व हकीकत वडिलांना सांगितली. याप्रकरणी पीडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन विधी संघर्षग्रस्त आरोपी विरोधात कलम
376,376 ड,376(2)(1)भादंवी सह कलम 4,5(ग),5(एम),6,8,12 पाॅक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथकाचे सपोनि ए.एस लांडगे करत आहेत.
0 Comments