google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान ... कोरोना आला सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर .... सतर्क रहा !

Breaking News

सावधान ... कोरोना आला सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर .... सतर्क रहा !

 सावधान ... कोरोना आला सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर .... सतर्क रहा !


 देशातील कोरोनाच्या धक्कादायक बातम्या समोर येत असतानाच आता कोरोना सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर येऊन पोहोचला असून, भविष्यातील संकट ओळखून प्रत्येकाने सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

परतलेला कोरोना गेल्या महिन्यापासून पुन्हा आपले वेगळे रूप दाखवत देशात समोर आलेला आहे.

 प्रचंड नुकसान करून गेलेल्या कोरोनाची आठवण आली तरी अंगावर काटा उभा राहतो. जगभरात या महामारीने जनजीवन विस्कळीत करून टाकले होते.

 दोन अडीच वर्षे या कोरोनाने छळले होते, त्याच्या काळ्या सावलीने दिलेल्या धक्क्यातून अजूनही पुरते सावरता आलेले नसतानाच पुन्हा त्याने आपले आस्तीत्व दाखवायला सुरुवात केली आहे.

 देशात विविध ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढू लागला असतानाच, केरळ राज्यात तो अधिकच आपले हातपाय पसरताना दिसत आहे. साहजिकच केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलेले असून, 

केंद्राने सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. केरळ सरकार आणि आरोग्य विभाग अधिक सतर्क झालेला आहे. केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरीएंट आढळून आला असून, रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

 त्यामुळे शेजारी राष्ट्र देखील सतर्क झालेली असून, खाबरादारीचे उपाय योजले जात आहेत. केरळ आणि अन्य राज्यात दाखल झालेला कोरोना आता महाराष्ट्रात देखील दाखल झाला असून मुंबईत तर या आधीच नव्याने रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात काल मंगळवारी कोरोना संसर्ग झालेले नवे ११ रुग्ण आढळले असून, यातील आठ रुग्ण मुंबईतील आहेत.  

या नव्या रुग्णासह एकूण रुग्णांची संख्या आता ३५ वर जाऊन पोहोचली आहे. यातील सर्वाधिक म्हणजे २७ रुग्ण हे केवळ मुंबईत आढळून आले आहेत.

 कोरोनाच्या सुरुवातीला देखील आधी मुंबई, नंतर पुणे आणि त्यानंतर पाहता पाहता खेडोपाडी हा कोरोना अत्यंत वेगाने पोहोचला होता आणि त्याने दाणादाण उडवलेली होती.

 आता महाराष्ट्रात मुंबईपासून सुरुवात झालेली असून, त्याचा प्रवास वेगाने सुरु झाला आहे. हा कोरोना आता मुंबईच्या बाहेर पडला असून, सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर म्हणजे पुण्यात देखील दाखल झाला आहे.

 आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार मुंबईत २७. पुण्यात २ तर कोल्हापूर येथे १ रुग्ण सक्रीय आहे. यातील २३ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत तर एक रुग्ण रुग्णालयीन विलगीकरणात आहे.

 आत्तापर्यंत नव्याने आढळून आलेले रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले नव्हते पण आता एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल झाला आहे.  

केरळमध्ये अधिक सतर्कता बाळगण्यात येत असून येथे मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

साठ वर्षे वयाच्या व्यक्ती आणि विविध आजार असलेल्या व्यक्ती यांच्याबाबत विशेष काळजी घेण्यात येत असून, गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

त्यासोबतच मास्क वापरण्याची सक्ती करण्यात येवू लागली आहे. आजवर इतर राज्यात दाखल झालेला कोरोना आता महराष्ट्रात तर दाखल झालाच आहे

 पण तो आता मुंबईच्या बाहेर पडला आहे.  कोरोना सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर येऊन पोहोचला असून, भविष्यातील संकट ओळखून प्रत्येकाने सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने अधिक चिंता व्यक्त होऊ लागली आहे. पुणे हा सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेला जिल्हा आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यानेही काळजी घेणे आवश्यक ठरू लागले आहे. 

पुण्यातून हा संसर्ग सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यास फारसा अवधीही लागत नाही हे यापूर्वी दिसून आलेले आहे. घाबरून जाण्यापेक्षा आणि पोकळ काळजी करण्यापेक्षा सतर्क रहाणे हेच या परिस्थितीत महत्वाचे ठरत असते.

Post a Comment

0 Comments