चोपडीकरांचे कुलस्वामी दैवत श्री सिद्धनाथ, माता जोगेश्वरी , श्री भोजलिंग या देवतांच्या यात्रेसाठी पारंपारिक पद्धतीने बैलगाड्या रवाना
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला /प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी गावकऱ्यांचे कुलस्वामी दैवत श्री सिद्धनाथ, माता जोगेश्वरी व श्री भोजलिंग या देवतांची म्हसवड व जांभुळणी डोंगर या
ठिकाणी मंगळवार दिनांक 12 डिसेंबर पासून यात्रा सुरू झाली असून 15 डिसेंबर पर्यंत यात्रा महोत्सव चालणार आहे .
परंपरेनुसार आपल्या कुलस्वामीच्या यात्रेसाठी चोपडी गावातून बैलगाडीच्या माध्यमातून सासनकाठी घेऊन अनेक यात्रेकरू म्हसवड या ठिकाणी यात्रेसाठी रवाना झाले आहेत .
बैलगाडीतून यात्रेसाठी जाणे यामध्ये एक वेगळाच आनंद मिळतो.आधुनिक युगात बैलगाडीने यात्रेसाठी प्रवास करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही ही परंपरा चोपडीकरांनी जोपासली आहे.
बैलगाड्यांनी जाणारे यात्रेकरू संध्याकाळपर्यंत म्हसवड येथे पोहोचतात..दुसऱ्या दिवशी श्री सिद्धनाथाचा गोडवा नैवेद्य व रथसप्तमीच्या दिवशी रथोत्सव असतो.यावेळी सर्व भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने या यात्रेचा आनंद घेतात व दैवतांची पूजा चर्चा करतात.
त्यानंतर डोंगरावरील कुलदैवत श्री भोजलिंग या देवतांसाठी चोपडीकर रवाना होतात व तेथे पूजा अर्चना करून मोठ्या आनंदाने घरी रवाना होतात.



0 Comments