शिरशी वाणी चिंचाळे घेरडी पारे ते जत तालुका हद्द रस्त्यासाठी १७७ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर -
आमदार शहाजीबापू पाटील. आशियाई विकास बँकेकडून होणार प्रकल्पाला अर्थसहाय्य.
सांगोला (वार्ताहर) (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३८७८१२)
मंगळवेढा सांगोला ते सांगली जिल्हा हद्दीतील जत तालुक्याला जोडणारा मंगळवेढा पारे जत रस्ता राज्यमार्ग क्र.१५६ मधील सांगोला तालुक्यातील
किमी २२/६०० ते ४४/८०० अशा एकूण २२/२०० किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाला डिसेंबर २०२३ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी
मागण्यातून १७७ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी नागपूर अधिवेशनातून दिली.
गेल्या चार वर्षापासून आमदार शहाजीबापू पाटील यांनी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता
या चालू अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना सदरच्या रस्त्याच्या कामाला
आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यित प्रकल्पांमध्ये समाविष्ट करून मंजुरी देण्याचे आदेश दिल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्याला भरघोस यश मिळाले आहे.
या कामासाठी ७० टक्के निधी आशीयाई विकास बँकेकडून तर ३० टक्के निधी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणार आहे.
सोलापूर व सांगली या दोन जिल्ह्याला जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण हा रस्ता असून २२/२०० किमी लांबीचा हा रस्ता १० मीटर रुंदीने डांबरीकरण होणार
असून सांगोला तालुक्यातील वाणी चिंचाळे व घेरडी गावांतर्गत काँक्रीटचा रस्ता होणार आहे यामध्ये ६ ठिकाणी बस थांबे,
छोटे पूल व स्वच्छतागृह यासह अनेक सोयी सुविधा असणार आहेत लवकरच या कामाच्या विस्तृत अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी
घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काम त्वरित सुरू करणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
मागील चार वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्यासह
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्वांचे आभार मानले
व लवकरात लवकर या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामास सुरुवात करून गुणवत्तापूर्वक काम पूर्ण करण्याचा मानस आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.



0 Comments