धक्कादायक ...परिचारिका आणि तिचे पती सेवानिवृत्त
प्राध्यापक यांचा ओळखीतून विश्वास संपादन करून सुरक्षा रक्षकाने २५ लाखांची केली फसवणूक
सांगोला : परिचारिका आणि तिचे पती सेवानिवृत्त प्राध्यापक यांचा ओळखीतून विश्वास संपादन करून सुरक्षा रक्षकाने (वॉचमन) माझ्या काकाची ३ एकर जमीन २५ लाख रुपये किमतीत खरेदी करून देतो,
असा बनाव करत फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनुजा शिवाजी शिंदे (रा. राऊत मळा, सांगोला) यांनी दिली आहे. शिंदे यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालय जत येथे उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी ज्योतीराम महादेव जगताप (रा. बनवडी, पो. देशिंग, ता. कवठेमंकाळ, जि. सांगली) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जगताप याने माझ्या वडिलोपार्जित जमिनीला लागून माझ्या सख्ख्या काकाचे ३ एकर क्षेत्र विक्रीसाठी निघाले असून,
त्यांना पैशाची गरजअसून, सदर जमीन मोक्याचे ठिकाणी व चांगली असल्याने तुम्ही आमच्या काकाची जमीन घ्यावी, असे तो म्हणाला
, यावर पती-पत्नीने त्याच्यावरविश्वास ठेवून २५ लाख रुपयांच्या मोबदल्यात सदर जमिनीचा व्यवहार ठरविला. पैसेही दिले. पण जमीन न देता फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे.
चौकट
धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयल...मनुजा शिंदे ३० जून २०२१ रोजी ग्रामीण रुग्णालय जत येथील ड्यूटी संपल्यानंतर दुपारी ३ वाजता त्यांच्या या दुचाकीने (क्र. एमएच ४५ एएन २३५१) सांगोल्याकडे येताना शेगावजवळ पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरील
दोघांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तो प्रकार ज्योतीराम जगताप यांनीच केल्याचे मनुजा शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments