खळबळजनक घटना....एक हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले; सोलापूर जिल्ह्यातील घटना
विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी घेतली लाच
विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
विठ्ठल पांडुरंग शिंदे गाव बेलाटी तालुका उत्तर सोलापूर असे ग्रामसेवकांचे नाव आहे.आज गुरुवारी दुपारच्या सुमारास पंचायत समिती उत्तर सोलापूर या कार्यालय परिसरात ही कारवाई झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी विवाह नोंदणी दाखला मिळण्यासाठी ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांच्याकडे अर्ज केला होता
दाखला देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी ग्रामसेवकांनी केली होती ती लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी शिंदे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
ग्रामसेवक शिंदे याच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
0 Comments