सांगोला येथे सेतू कार्यालय सुरू होणार शहीद जवान संस्थेच्या पाठपुराव्याला यश..
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला तहसील आवारात सेतू कार्यालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने दिनांक ३१/८/ २०२३ रोजी तत्कालीन
तहसीलदार सांगोला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे ई- मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले होते.
या संस्थेच्या मागणीला यश आले असून दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी सर्व तालुक्यात सेतू कार्यालय सुरू होणार असून याबाबतचा आदेश सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले असून यामुळे सांगोल्यात सेतू कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या सेतू कार्यालयामुळे सांगोला शहर क तालुक्यातील, नागरिकांचे विद्यार्थ्यांचे माफक दरात प्रतिज्ञापत्र, दाखले, मिळण्यास फार मोठी मदत होणार आहे.
या सेतूचा ठेका गुजरात इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना मिळाला आहे. सेतू कार्यालय चालू होण्याबाबत संस्थेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून संस्थेच्या या कार्याचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
0 Comments