google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित प्राथमिक शिक्षण विभागाचे भ्रष्ट जिल्हा प्राथमिक तत्कालीन शिक्षणाधिकारी लोहार यांच्याकडे सापडलं ५कोटी८५लाख८५हजाराचं अतिरिक्त पैसा

Breaking News

सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित प्राथमिक शिक्षण विभागाचे भ्रष्ट जिल्हा प्राथमिक तत्कालीन शिक्षणाधिकारी लोहार यांच्याकडे सापडलं ५कोटी८५लाख८५हजाराचं अतिरिक्त पैसा

 सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित  प्राथमिक शिक्षण विभागाचे


भ्रष्ट जिल्हा प्राथमिक तत्कालीन शिक्षणाधिकारी


लोहार यांच्याकडे सापडलं ५कोटी८५लाख८५हजाराचं अतिरिक्त पैसा

सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार यांच्यासह पत्नी व मुलाविरुद्ध अपसंपदा अर्थात ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ५ कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपये व आठ पैसे इतकी अवैध संपत्ती

 जमा जमवल्याचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत नेताजी महाडिक यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 768/ 2023 अन्वये गुन्हा नोंद केला आहे .

 लोकसेवक किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना परीक्षण कालावधी १५ नोंंव्हेबर १९९३ ते

 १३ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत भष्ट व गैर मार्गाने कायदेशीर व ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ५कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपये व आठ पैसे किमतीची अपसंपदा संपादित केल्याचे 

व पत्नी सौ सुजाता किरण लोहार व मुलगा निखिल किरण लोहार यांनी लोकसेवक किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले

 असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी केले आहे

 तर या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केला आहे .पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शितल जानवे खराडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Post a Comment

0 Comments