आनंदाभाऊ माने यांनी क्रिकेट खेळ शहरासह खेड्यात ही लोकप्रिय केला: आमदार शहाजीबापू पाटील
विजयभाऊ केदार ब्रँड 11 निमगाव हा क्रिकेट संघ 1लाख 50 हजार रुपये बक्षिस व नगराध्यक्ष चषकाचा ठरला मानकरी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी: दशरथ बाबर) : देवा स्पोर्ट्स सांगोला व राजमाता प्रतिष्ठान सांगोला यांच्यामार्फत ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त
नगराध्यक्ष चषक 2023 भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या.आनंदाभाऊ माने यांनी सांगोला शहरासह खेड्यातही क्रिकेट खेळ लोकप्रिय केला.
नजीकच्या काळात सांगोला क्रीडा संकुलाचे रूपांतर भव्य अशा स्टेडियममध्ये करण्यासाठी 57 कोटीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला असून येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होईल .
त्यामुळे भविष्यात खेळाडूंसाठी चांगले स्टेडियम बनवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झालेले असेल अशी माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला येथील क्रीडा संकुल येथे नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामन्याप्रसंगी बोलताना दिली .
ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा भरवल्याबद्दल संयोजकाचे व आयोजकांचे विशेष कौतुक करीत या सामन्यामुळे खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली त्याबद्दल धन्यवाद दिले.
ओम माने यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी माजी नगरसेवक व राजमाता प्रतिष्ठानचे
अध्यक्ष आनंदा गोरख माने यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.हे बक्षीस विजयभाऊ केदार ब्रँड 11 निमगाव या संघाने जिंकून प्रथम क्रमांक पटकावला .
या संघास हे बक्षीस व चषक बापूसाहेब गावडे, सुनील धतिंगे, आनंदाभाऊ माने व ओम माने यांच्या हस्ते देण्यात आले.द्वितीय क्रमांकाचे 1 लाख रुपयांचे बक्षीस प्रशांत गावडे व हणमंतदादा चव्हाण यांच्यातर्फे देण्यात आले
असून हे बक्षीस राम रहीम इंडियन क्रिकेट क्लब सांगोला या संघाने जिंकले .या संघास एक लाखाचे बक्षीस व नगराध्यक्ष चषक हणमंत दादा चव्हाण ,प्रशांत गावडे, माऊली तेली, जितेंद्र चंदनशिवे यांच्या हस्ते
देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे 75 हजार रुपयांचे बक्षीस काशिलिंग गावडे ,इंजि.दिनेश येडगे, सागर विजय माने , यांच्या तर्फे देण्यात आले.
हे बक्षीस आर.सी.सी क्रिकेट संघ बार्शी यांना देण्यात आले. असून 75 हजार रुपये व नगराध्यक्ष चषक काशिलिंग गावडे, दिनेश येडगे सागर विजय माने ,समीर पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
चतुर्थ क्रमांकाचे 50 हजार रुपयांचे बक्षीस माजी नगरसेवक सिद्धेश्वर जाधव व युवा सेना तालुका अध्यक्ष दीपकदादा खटकाळे यांच्यातर्फे देण्यात आले. हे बक्षीस सिद्धेश्वर जाधव, दीपकदादा खटकाळे व दत्ताभाऊ जानकर यांच्या हस्ते देण्यात आले,
नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामन्यासाठी चषक सौजन्य कै. सुभाषआप्पा लिंगे यांच्या स्मरणार्थ गणेश मोबाईल शॉपी यांच्यातर्फे देण्यात आले .या सामन्यासाठी बॉल सौजन्य दत्ताभाऊ जानकर यांचे होते.
प्रत्येक सामना सामनावीर आकर्षक ट्रॉफी उल्हास मेटकरी यांच्याकडून देण्यात आले. सर्व सामन्यातील मालिकावीर आसिफ मुजावर यांना अण्णा मारुती गडदे यांच्याकडून वाशिंग मशीन देण्यात आली. हे बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
विजेत्या संघास व खेळाडूस मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा देवा स्पोर्ट्स सांगोला व राजमाता प्रतिष्ठान सांगोला यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आमदार शहाजी बापू पाटील , मा .नगराध्यक्षा राणीताई माने मा.नगरसेविका छायाताई मेटकरी, मा. नगरसेवक आनंदभाऊ माने मा. उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, महेश कदम, उल्हास मेटकरी ,
मा.नगरसेवक माऊली तेली, अरुण पाटील ,ज्ञानेश्वर इमडे, सतीश बनसोडे, राज कोकरे, गणेश लिंगे, लखन चव्हाण, विशाल शिंदे, बिट्टू मुलाणी, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते .या क्रिकेट सामन्यांचे समलोचन राज वाघमारे यांनी केले.
देवा स्पोर्ट्स व राजमाता प्रतिष्ठान सांगोला यांनी नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या क्रिकेट सामन्यासाठी अनेक मान्यवरांनी आर्थिक सहकार्य , मदत व बक्षिसे दिली आहेत.
0 Comments