google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिरभावी पाणी योजनेची थकबाकी दीड कोटीच्या घरात, दहा लाखांची वसुली; नऊ गावांना पाणीपुरवठा

Breaking News

शिरभावी पाणी योजनेची थकबाकी दीड कोटीच्या घरात, दहा लाखांची वसुली; नऊ गावांना पाणीपुरवठा

 शिरभावी पाणी योजनेची थकबाकी दीड कोटीच्या घरात, दहा लाखांची वसुली; नऊ गावांना पाणीपुरवठा


सोगोला तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या 'शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजने'ची 57 गावांकडे नोव्हेंबर अखेरची थकबाकी तब्बल 1 कोटी 39 लाख 73 हजार 254 रुपयांच्या घरात गेली आहे.

 आतापर्यंत 9 लाख 79 हजार 606 रुपयांची थकबाकी वसुली झाली आहे.सध्या फक्त नऊ गावांना मागणीनुसार पाणीपुरवठा केला जात आहे.

 विशेष म्हणजे 2018 च्या दुष्काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून 'शिरभावी पाणीपुरवठा योजने'तून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्याला पाणीपुरवठा केला होता. 

मात्र, गेल्या पाच वर्षांपासून मंगळवेढा आणि पंढरपूर पंचायत समितीसह सांगोला पंचायत समिती व सांगोला तहसील कार्यालयाकडे 'शिरभावी पाणीपुरवठा योजने'ची थकबाकी आहे तशीच आहे.

ऐन उन्हाळ्यातही वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. 

दुष्काळी सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे.

 सध्या सांगोला, मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील 52 गावांकडे एक कोटी 12 लाख 18 हजार 050 रुपयांची थकबाकी आहे. तर शेतकरी सूतगिरणीकडे 7,44,983, महिला सूतगिरणीकडे 20,976, 

सह्याद्री कॉलेजकडे 6,515, मंगळवेढा पंचायत समितीकडे 2,60,356, पंढरपूर पंचायत समिती 43,200, सांगोला तहसील कार्यालय 1,84,099, सांगोला पंचायत समितीकडे 12,240, तर 

सांगोला नगरपरिषदेकडे नोव्हेंबर महिन्याची 14,82,835 अशी एकूण शिरभावी पाणीपुरवठा योजनेची थकबाकी 1 कोटी 39 लाख 73 हजार 254 रुपये इतकी आहे.

मंगळवेढा, सांगोला व पंढरपूर पंचायतकडेही थकबाकी 2018 च्या दुष्काळात नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी

 'शिरभावी योजने'मधून मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते.

 परंतु पाच वर्षांनंतरही मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीने 'शिरभावी योजने'ची बिले थकवली आहेत. मंगळवेढा पंचायत समितीकडे 2 लाख 60 हजार 356 रुपये,

 पंढरपूर पंचायत समितीकडे 43 हजार 200 रुपये थकबाकी आहे. तसेच सांगोला तहसील कार्यालयाकडे 1 लाख 84 हजार 099, सांगोला पंचायत समितीकडे 12 हजार 240 रुपये इतकी थकबाकी आहे.

Post a Comment

0 Comments