शेकापच्या सौ आशाताई कांबळे यांची महुदच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड
महुद गावच्या उपसरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाच्या सौ.आशाताई दौलत कांबळे यांची निवड संपन्न झाली...
विद्यमान उपसरपंच सौ.मालनताई आटपाडकर यांनी ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला.. त्या ठिकाणी सौ.आशाताई दौलत कांबळे यांची उपसरपंचपदी निवड संपन्न झाली..
सौ.आशाताई कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी अभिजीत पवार व सरपंच सौ.संजीवनी कल्याण लुबाळ यांनी सौ.आशाताई कांबळे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
सौ.आशाताई कांबळे ह्या दौलतराव कांबळे यांच्या सुविध्य पत्नी आहेत..या पुर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून भाई.दौलत कांबळे यांनी
महुद ग्रामपंचायतीचे सरपंच पद भुषविले आहे..पतीने महुदचे सरपंच पद भुषविले तर आता पत्नीला उपसरपंच पदाचा मान शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मिळाला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून स्व गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांनी महुद जि.प.गटातील अनेक मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना विविध पदांवरती काम करण्यासाठी संधी यापूर्वी दिली आहे त्यामध्ये उपसभापती ,
जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,महिला सुत गिरणी तसेच सरपंच पदे अशी अनेक पदे देऊन मागासवर्गीय समाजाला संधी दिली आहे स्व आबासाहेबांच्या कामाचा आदर्श घेत डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सौ.आशाताई दौलत कांबळे यांची महुदच्या उपसरपंच पदी निवड करुन शेतकरी कामगार पक्षाने मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देण्याची परंपरा कायम राखली आहे.
सदर निवडी प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच महुद गावातील विविध संस्थांचे आजी माजी सदस्य व महुद
गावचे शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली


0 Comments