आ.गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्लयाच्या निषेधार्थ सांगोल्यात कडकडीत बंद पाळण्यात आला
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- इंदापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार दि. १६ डिसेंबर रोजी सांगोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी सकल बहुजन समाज व गोपीचंद (शेठ) पडळकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हल्लयाच्या निषेधार्थ पुकारण्यातआलेल्या बंदला सांगोला शहरात शंभर क टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासून व्यापारी बांधवांनी शहरातील आपआपली दुकाने बंद ठेवली होती. शहर व परिसरातील अत्यावश्यक सेवा, सुविधा मात्र सुरळीत सुरु होत्या.
या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी गोपीचंद पडळकर आप आगेबढो हम तुम्हारे साथ है, एकच छंद गोपीचंद अशा जोरदार घोषणाबाजी करत
संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर उतरलेले
असून झालेल्या हल्ल्याचा वेगवेगळ्या माध्यमातून निषेध करीत आहेत. आमदार पडळकर यांच्यावर हल्ला करून डिवचण्याचा प्रयत्न होत असून हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, वेळ आल्यास
जशास तसे उत्तर देऊ. आ. गोपीचंद पडळकरयांच्यावर झालेला हा हल्ला निंदनीय व भ्याड असून आम्ही पळणारे नसून लढणारे आहोत
अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. यावेळी अरविंद वलेकर, उल्हास धायगुडे, संतोष देवकते, शिवाजीनाना बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शहरातील सर्व समाजातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे आयोजकांकडून शेवटी आभार मानण्यात आले.


0 Comments