google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल मीडिया प्रभावी माध्यम असून ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे डिजिटल मीडिया पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी

Breaking News

तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल मीडिया प्रभावी माध्यम असून ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे डिजिटल मीडिया पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी

 तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल मीडिया प्रभावी माध्यम असून ते


मुख्य प्रवाहात आले पाहिजे डिजिटल मीडिया पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी

पंढरपूर - दिनांक ८डिसेंबर डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी सचिन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रमाणेच डिजिटल

 मिडियात काम करणाऱ्या संपादक व पत्रकारांना मुख्य प्रवाह सामावून घेण्यासाठी डिजिटल मीडिया संघटना काम करत आहे. 

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वात आणि संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुनील उंबरे तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत व उपाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनात 

पंढरपूर शहर कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचे निवड करण्यात आली यामध्ये सचिन कुलकर्णी यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी विजय कांबळे आणि गणेश महामुनी यांची निवड करण्यात आली. 

ज्येष्ठ पत्रकार राजकुमार शहापूरकर व नागेश सुतार हे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. सचिन झाडे कार्याध्यक्ष, अपराजित सर्वगोड सचिव, अश्पाक तांबोळी सहसचिव, दगडू कांबळे खजिनदार, राम अभंगराव सहखजिनदार, सोहन जैस्वाल प्रसिद्धीप्रमुख, नागेश काळे संपर्कप्रमुख,

 असे पदाधिकारी असून कबीर देवकुळे, सूर्याजी भोसले, मंदार मंगसुळकर, हुसेन मुलाणी, राजेंद्र काळे, अजिंक्य इंदापूरकर, रवी सोनार, संतोष चव्हाण, लखन साळुंखे आदींची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

 या सर्वांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील उंबरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व उपाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. 

"पत्रकारितेत काळानुरूप स्थित्यंतरे होत आली आहेत सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरत असून त्याचे महत्व दुर्लक्षित करून चालणार नाही.

 त्यामुळे डिजिटल मीडियाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणार", असल्याचे नवनियुक्त शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments