google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथील सुजाता बाबर हिची विद्यापीठ संघात निवड

Breaking News

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथील सुजाता बाबर हिची विद्यापीठ संघात निवड

 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथील सुजाता बाबर हिची विद्यापीठ संघात निवड


सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील कुमारी सुजाता बाबर (बी.ए. भाग १) हिची अखिल भारतीय

 आंतर विद्यापीठ अथलेटिक्स स्पर्धे साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ऍथलेटिक्स संघात निवड झालेले आहे.


सदरच्या ऍथलेटिक्स स्पर्धा दि. २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२३ अखेर आय आय टी युनिव्हर्सिटी भुवनेश्वर ओरिसा येथे संपन्न होणार आहे.

 सुजाता बाबर ही उंच उडी क्रीडा प्रकारातील निशांत खेळाडू असल्यामुळे तिची विद्यापीठ संघात निवड करण्यात झालेली आहे.

 तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी, संस्थेचे सचिव श्री. विठ्ठलराव शिंदे सर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला

 व तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार व प्रा. हनुमंत कोळवले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments