google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला - मंगळवेढा रस्त्यावर पती पत्नीचा कारच्या धडकेने मृत्यू जीव घेऊन 'त्याने' ठोकली धूम ! सोलापूर जिल्ह्यातील अपघातात चार जणांचा मृत्यू !

Breaking News

सांगोला - मंगळवेढा रस्त्यावर पती पत्नीचा कारच्या धडकेने मृत्यू जीव घेऊन 'त्याने' ठोकली धूम ! सोलापूर जिल्ह्यातील अपघातात चार जणांचा मृत्यू !

 सांगोला - मंगळवेढा रस्त्यावर पती पत्नीचा कारच्या धडकेने  मृत्यू  जीव घेऊन 'त्याने'


ठोकली धूम !  सोलापूर जिल्ह्यातील अपघातात चार जणांचा मृत्यू !

एका भरधाव वेगातील कारने दुचाकीवरील पती पत्नीला उडवले असून या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला तर बेदरकार कार चालक घटना स्थळावरून पळून गेला असल्याची घटना समोर आली आहे.

रस्त्यावरील अपघात ही आता नित्याची बाब झाली असून कुणालाच कुणाच्या जीवाची पर्वा उरलेली दिसत नाही.

 प्रत्येकाला घाई झालेली असून, जगात फक्त आपल्यालाच काम आहे अशी भावना ज्याची त्याची झाली असल्यामुळे इतरांच्या जीवाचा विचार करायला कुणी तयार नाही.

 रोज विविध रस्त्यावर अत्यंत गंभीर आणि मोठ्या स्वरूपाचे अपघात होत आहेत. रस्ते रुंद आणि चकाचक झाल्यापासून रस्त्यावर माणसांच्या जीवाचेही मोल उरले नाही.

 विशेष म्हणजे अपघात करून वाहने थेट पळून जाताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यात अशीच आणखी एक घटना समोर आली असून, सांगोला - मंगळवेढा रस्त्यावर पती पत्नीचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. 

दुचाकीवरून निघालेल्या पती पत्नीला, एका भरधाव कारने उडवले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि कार चालक मात्र तेथून पळून गेला आहे आणि आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सांगोला - मंगळवेढा रस्त्यावर शेलेवाडी चौकात हा भीषण अपघात झाला आहे. या चौकात एका कारने पती पत्नीच्या दुचाकीला जोराची धडक दिली. मुळचे रायगड जिल्ह्यातील वाकणवाडी येथील असलेले 

पण सद्या मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी येथे राहणारे,   विजय मारुती जाधव (वय ४०) व त्यांची पत्नी कविता विजय जाधव (वय ३५ ) हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. 

शेलेवाडी चौकातून ते दुचाकीवरून रस्ता ओलांडत होते. मंगळवेढा येथे ते बाजारासाठी आलेले होते आणि बाजार करून परत ते शेलेवाडी येथे निघाले होते. रस्ता ओलांडत असताना, 

 सांगोल्याच्या बाजूने येणाऱ्या एक भरधाव वेगातील कारने (क्र.के.ए. २८ एम ए. २३५१) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीवरून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले.

 या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. लाकडापासून कोळसे पाडण्याचे काम करणाऱ्या या पती पत्नीचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सदर अपघाताबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून. कार चालक अपघात झाल्यानंतर तेथून पळून गेला आहे. पोलीस आता या कार चालकाचा शोध घेत आहेत. 

 अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी येथे धाव घेतली परंतु पती पत्नी यांचा या अपघातात जागीच मृत्यू झालेला होता. 

वेगाचा आणखी एक बळी !कारखाना कामगार ठार !

पंढरपूर तालुक्यातील आणखी एका अपघातात, खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्यातील हंगामी कामगार ठार झाला आहे.

 साखर कारखान्यातील आपले काम आटोपून, पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील विश्वजित ज्ञानेश्वर सावंत हा २२ वर्षांचा तरुण, दुचाकीवरून आपल्या घरी निघाला होता. 

पहाटेच्या सुमारास तो पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथे, कै. वसंतदादा काळे महाविद्यालयासमोर आलेला असतानाच, एका अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली.

 या अपघातात विश्वजित सावंत याचा जागीच मृत्यू झाला. पंढरपूर ग्रामीण पोलिसात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पंढरपूर तालुक्यातही वेगाचा आणखी एक बळी गेला असून, वेगाने निघालेली दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या सिद्धेश्वर रामचंद्र साळुंखे ( वय ३८, खेड भाळवणी, ता. पंढरपूर) यांचा मृत्यू झाला आहे. 

खेड भाळवणी ते बाजीराव विहीर या दरम्यान हा अपघात झाला. भरधाव वेगाने निघालेली दुचाकी अचानक रस्त्यावरून घसरली त्यामुळे खाली पडून साळुंके जबर जखमी झाले होते.

 त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. वेगातील दुचाकी घसरली असल्याने त्यांना जोराचा मार लागला होता त्यामुळे, उपचार घेत असताना, त्यांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments