google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना... ट्रॅक्टर अंगावर घालून पतीनेच पत्नीची हत्या पत्नीचा खून करून अपघात असल्याचा बनाव रचला

Breaking News

खळबळजनक घटना... ट्रॅक्टर अंगावर घालून पतीनेच पत्नीची हत्या पत्नीचा खून करून अपघात असल्याचा बनाव रचला

खळबळजनक घटना... ट्रॅक्टर अंगावर घालून पतीनेच पत्नीची हत्या


  पत्नीचा खून करून अपघात असल्याचा बनाव रचला

राज्यातील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील कुंभारी शिवारात ट्रॅक्टर अंगावर घालून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 रात्री गजाननने कविताच्या खुनाचा बेत आखला. गजाननने आधी कविताला जीवे मारुन टाकले, 

नंतर हा खून नसून हा अपघात असल्याचा बनाव रचण्यासाठी तिला ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकले. दरम्यान ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झालेल्या २९ वर्षीय कविता गजानन आढाव

 हिचा वर्षभरापूर्वीच फुलंब्री तालुक्यातील पाल पाथ्री येथील गजानन आढाव याच्यासोबत विवाह झाला होता. गजाननचा हा तिसरा विवाह आहे. गेल्या काही दिवसांपासून काही ना काही कारणाने दोघांमध्ये सतत प्रचंड वाद होत होते.

 गेल्या महिन्यातच गजानन विरुद्ध (औरंगाबाद) संभाजीनगरातील हर्सुल पोलीस ठाण्यात भांडणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कविता माहेरी गेली होती. पण तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींनी मध्यस्थी करुन भांडण सोडवून

 त्यांच्यात दिलजमाई घडवून आणली होती. दोघांचा संसार पुन्हा नव्याने सुरु झाला होता. गेल्या आठवड्यातच गजानन कविता हिला सासरी घेऊन गेल्याची माहिती कविताच्या नातेवाईकांनी दिली. 

कविता ही सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कोतवाल या पदावर कार्यरत होती, तर गजानन हा संभाजीनगर येथे वीज वितरण कार्यालयात लिपीक या पदावर कार्यरत आहे.

 दोघेही सरकारी नोकरदार असल्याने या प्रकाराने खळबळ उडाली आहे. कविताच्या मृत्यूच्या दिवशीही त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून पुन्हा वाद झाला, 

तोच राग डोक्यात ठेवून, रात्री गजाननने कविताच्या खुनाचा बेत आखला. गजाननने तिला अगोदर मारून टाकले, नंतर हा खून नसून हा अपघात वाटावा, 

असा बनाव रचून त्याने तिला ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकले. या घटनेची वाच्यता होताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत पंचनामा केला असून आरोपी गजानन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments