google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आध्यात्मिक! पंढरपुरात आजपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेची मेजवानी; अभिजीत पाटील यांची माहिती; सात दिवसांत शंभर कोटी उलाढालीचा अंदाज

Breaking News

आध्यात्मिक! पंढरपुरात आजपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेची मेजवानी; अभिजीत पाटील यांची माहिती; सात दिवसांत शंभर कोटी उलाढालीचा अंदाज

 आध्यात्मिक! पंढरपुरात आजपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेची मेजवानी;


अभिजीत पाटील यांची माहिती; सात दिवसांत शंभर कोटी उलाढालीचा अंदाज 

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेला आज दुपारी एक वाजता प्रारंभ होणार आहे. यासाठी विविध राज्यांतून सुमारे तीन ते चार लाख भाविक दाखल होतील, 

असा अंदाज आहे. पंढरपूरकरांना शिवपुराण कथेच्या निमित्ताने आजपासून सात दिवस प्रथमच आध्यात्मिक मेजवानी मिळणार आहे.

यादरम्यान पंढरपुरात मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. कथेच्या निमित्ताने आध्यात्मिकतेबरोबर पर्यटन देखील वाढणार आहे.

 सात दिवसांमध्ये किमान शंभर कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होईल, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.

यावेळी अभिजित पाटील म्हणाले, की पंढरपुरात प्रथमच पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे दि.२५ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजन केले आहे. या कार्यक्रमाविषयी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील लोकांना मोठी उत्सुकता लागली आहे

येथील चंद्रभागा मैदानाच्या २२ एकर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची, जेवणाची सोय केली आहे.

दोन दिवसांपासूनच राज्यासह इतर भागातून मोठ्या संख्येने भाविक चंद्रभागा मैदानावर दाखल झाले आहेत. येथील कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळणार आहे.

कथेसाठी येणाऱ्या अनेक भाविकांनी यापूर्वीच शहरातील मठ, धर्मशाळा, लॉज, हॉटेल बुक केले आहेत.

दोन दिवसांपासून शहरात भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे हॉटेल, रिक्षा, टांगा, पानटपरी, 

चहा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना याचा चांगला फायदा झाला आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने छोट्या व्यावसायिकांना रोजगार मिळाला आहे.

कथेच्या निमित्ताने पंढरपूरकडे पर्यटन केंद्र म्हणून देखील पाहिले जाऊ लागले आहे. त्यामुळे अनेक नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत.

 सात दिवसांमध्ये किमान शंभर कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होईल, असा अंदाजही श्री. पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव उपस्थित होते.

हिंदी भाषिक भाविकांचा पंढरीकडे ओढा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाची महती देशभर आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी विशेषतः दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. तुलनेने उत्तर भारतातून येणाऱ्या हिंदी भाषिक भाविकांची संख्या कमी आहे.

परंतु पंडित प्रदीप शर्मा यांच्या शिवपुराण कथेच्या निमित्ताने प्रथमच उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब अशा विविध प्रांतांतून अनेक भाविक प्रथमच पंढरपूरला येणार आहेत.

 त्यामुळे या कथेच्या माध्यमातून उत्तर भारतातील हिंदी भाषिक असलेले भाविक यापुढच्या काळात अधिक संख्येने येतील, असा विश्वासही यावेळी अभिजित पाटील यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments