google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात ईव्हीएमवर मतदान कसं करायचं? घरोघरी सांगणार मोबाईल व्हॅन; २२ वाहनं सज्ज; दोन महिने चालणार मोहीम

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात ईव्हीएमवर मतदान कसं करायचं? घरोघरी सांगणार मोबाईल व्हॅन; २२ वाहनं सज्ज; दोन महिने चालणार मोहीम

 सोलापूर जिल्ह्यात ईव्हीएमवर मतदान कसं करायचं?


घरोघरी सांगणार मोबाईल व्हॅन; २२ वाहनं सज्ज; दोन महिने चालणार मोहीम
 

ईव्हीएम यंत्राबाबत आज अनेक अफवा अन् गैरसमज आहेत. 

या अफवा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ईव्हीएम यंत्र आता मतदारांच्या दारापर्यंत घेऊन जाणार आहे. ईव्हीएम यंत्र कशा पद्धतीने काम करते.

यंत्रावर सुरक्षितपणे मतदारांना कशा पद्धतीने मतदान करता येते, याबाबत आता प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 २२ मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सर्वसामान्य नागरिक व मतदारांना ईव्हीएम प्रणालीबाबत माहिती व्हावी. तसेच नवमतदारांना मतदान कसे करायचे याचे प्रात्यक्षिक देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात

प्रत्येकी दोन याप्रमाणे २२ मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. ही जनजागृती मोहीम आज, मंगळवार पासून सुरू होणार आहे. मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी केले आहे.

उत्तर व दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना तसेच मतदारांसाठी ईव्हीएम प्रात्यक्षिक सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

ईव्हीएम यंत्र शंभर टक्के सुरक्षित

ईव्हीएम यंत्र नव्हे आपल्या मताचे ब्लूलेटप्रुफ कवच आहे. यात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही. विनापरवाना अनधिकृत वापर ओळखण्याच्या तंत्रज्ञाने सांकेतिक लिपी, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती स्वतःच ओळखण्याच्या क्षमतेने

सज्ज असून, रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून माहितीच्या आदानप्रदानाबाबत अक्षम आहे. हे मशीन शंभर टक्के सुरक्षित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

Post a Comment

0 Comments