google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना.... जमिनीच्या वादातून चुलत्याला संपवलं, कुऱ्हाडीने वार करत अर्धा तास रक्तरंजित थरार, दुचाकीवर शीर घेऊन फरार

Breaking News

खळबळजनक घटना.... जमिनीच्या वादातून चुलत्याला संपवलं, कुऱ्हाडीने वार करत अर्धा तास रक्तरंजित थरार, दुचाकीवर शीर घेऊन फरार

खळबळजनक घटना.... जमिनीच्या वादातून चुलत्याला संपवलं, कुऱ्हाडीने वार करत


अर्धा तास रक्तरंजित थरार, दुचाकीवर शीर घेऊन फरार

सोलापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना सोमवारी घडली आहे. शेतीच्या वादावरून पुतण्याने चुलत्याचा कुऱ्हाडीने गळा कापला.

 तो एवढ्यावर न थांबता कुऱ्हाडीने मुंडके धडावेगळे केले. सावत्र चुलत्याची निर्घृण हत्या करून संशयीत आरोपी पुतणे हे मुंडके घेऊन फरार झाले होते. 

खुनाचा थरार माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शेवरे येथील कुरणवस्तीवर सोमवार

 दि. ११ रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडला आहे. संशयीत आरोपी मुंडके घेऊन फरार झाल्याने खळबळ उडाली होती.

सोमवारी दिवसभर टेंभुर्णी पोलीस मृत शरीराचे मुंडके शोधत होते. आरोपींनी घटनास्थळी पासून दहा किमी अंतरावर मक्याच्या शेतात मुंडके फेकून आरोपी फरार झाले होते. 

सायंकाळच्या सुमारास मुंडके मिळाले असून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन सुरू असून मंगळवारी अंतिम संस्कार केले जाणार आहे.

 खून करणाऱ्या आरोपींपैकी एकाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. आणखी संशयीत आरोपींचा शोध सुरू असल्याचे एपीआय जोग यांनी सांगितले आहे. शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५) असे त्या मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर प्रल्हाद जाधव आणि आरोपी शिवाजी बाबासाहेब जाधव यांच्यात अनेक महिन्यांपासून जमिनीचा वाद चालू होता. 

त्याचाच राग मनात धरून आरोपी शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव, 

अजित बाबासाहेब जाधव (सर्व रा. शेवरे ता. माढा) हे चार भाऊ चुलते शंकर जाधव सोमवारी सकाळी यांच्या घरी गेले. शिवाजी जाधव याने धारदार कुन्हाडीने वार करून शंकर जाधव यांचे मुंडके धडावेगळे करून खून केला.

चार भावांनी सावत्र चुलत्याला जागेवर संपवलं. जवळपास अर्धा ते पाऊण तास हा खुनी थरार शेवरे वस्तीवर सुरू होता. आरोपी शिवाजी जाधव याने शंकर जाधव यांना ठार करून कुऱ्हाडीने मुंडके धडावेगळे केले. 

शंकर जाधव यांचे मुंडके घेऊन मोटारसायकलवरून फरार झाला. मृत शंकर जाधव यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. घटना घडत असताना सुदैवाने कुणीही नव्हते.

 अन्यथा मोठा हत्याकांड घडला असता अशी चर्चा शेवरे परिसरात सुरू आहे. या घटनेची फिर्याद शेजारी राहणाऱ्या नरहरी नवनाथ बंडलकर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे.

 पोलिसांनी शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव व अजित बाबासाहेब जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जोग हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments