सांगोला तालुक्यात क्षयरोगाच्या (टी.बी.) आजाराला कंटाळून नैराश्येतून
स्वतःच्या गळ्याला चाकू मारून एका ३८ वर्षीय युवकाची आत्महत्या
सांगोला नाझरे माण नदी पात्रातील स्मशानभूमीनजीक एका ३८ वर्षीय युवकाने क्षयरोगाच्या (टी.बी.)
आजाराला कंटाळून नैराश्येतून स्वतःच्या गळ्याला चाकू मारून घेऊन जखमी होऊन मरण पावल्याची घटना उघडकीस आली आहे.
पप्पू ऊर्फ सत्यवान सिध्दा वाघमारे (वय ३८) असे मरण पावलेल्या युवकाचे जाव आहे.
पप्पूला मागील एक महिन्यापूर्वी टीबी झाल्याचे समजले, बलवडीतील दवाखान्यात उपचार घेतले होते. तेव्हा डॉक्टरांनी त्याला टी.बी. आजार असून, सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला होता. मागील दोन दिवसात पप्पूने
सरकारी दवाखान्यात उपचार घेतले
होते. तो मागील एक महिन्यापासून नैराश्य अवस्थेत होता. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तो परीच होता.
खबर देणार हे शेळ्या चारण्यासाठी गेले असता, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गावातील एकाने त्यांना फोन करून पप्पूनेआत्महत्या केल्याची माहिती दिली.
त्यांनी तुमचा मुलगा पपू हा नाझरा माण नदी पात्रात स्मशानभूमी जवळ स्वतः गळ्याच्या खाली चाकूने मारुन जखमी करून, त्यात तो स्वतः मयत झाल्याचे सांगितले.
सदर मक्त पप्पू याच्याजवळ एक लहान चाकू पडलेला होता. असे पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे.


0 Comments