सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी यांची विनापरवाना वृक्षतोडीवर धडक कारवाई ;
ट्रक,पिकअप सह ३० हजार रुपये किमतीचे कडुलिंबाचे लाकुड जप्त !
वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल सांगोला, वनरक्षक सांगोला दिनांक 23.12.2023 रोजी रात्रीची गस्त् करीत असताना
सांगोला कोपटी वस्ती येथील श्री.रणजीत चंद्रशेखर ढोले यांच्या मालकी क्षेत्रात ट्रक क्रमांक MH-10 A-6373 मध्ये कडुलिंब झाडाचे जळाऊ लाकुड भरत असताना दिसून आले.
तसेच ट्रक जवळच पिकअप क्रमांक MH-45-3032 मध्ये डिझेल इंजिन व झाडतोडण्यासाठी लाकुड कटर -2, कु-हाड-5 झाडतोड करण्यासाठी वापरल्याचे दिसून आले ते जप्त केले आहे.
कडुलिंब झाडे -3, केलेचे दिसून आले. विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतुक केले मुळे ट्रकमधील 6.00 घमी व जागेवरील 4.00 घमी असा एकुण 10.00 घमी लाकुडमाल जप्त केला.
लाकुड मालाची किंमत अंदाजे रक्कम रुपये 30000/- होईल. ट्रक ड्रायव्हर मधुकर भगवान बोरगे रा. जवळा व पिकअप ड्रायव्हर अकबर गुलाब मुलाणी रा. एखतपूर ता. सांगोला जि. सोलापूर यांचेवर पंचनामा,
जबाब कागदपत्र करून प्रथम गुन्हा क्रमांक ओ-12/2023 दिनांक 23.12.2023 रात्री 8.00 वा नोंद केला आहे पुढील तपास चालु आहे. ट्रक व पिकअप जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला जवळ ठेवलेले आहेत.
सदरची कारवाई मा. धैयशील पाटील उपवनसंरक्षक सोलापूर व मा.बी. जी. हाके सहाय्यक वनसंरक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शणाखाली करण्यात आली .
सदर कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम जाधवर, वनपाल सांगोला एस.एल. मुढे, एस, एल, वाघमोडे वनपाल जुनोनी, जी.बी. व्हरकटे वनरक्षक सांगोला, कृष्णा मुढे वनरक्षक घेरडी, श्रीमती व्ही.पी. इंगोले वनरक्षक अचकदाणी यांनी केली.
सांगोला तालुक्यातील लोकांना अवाहान करण्यात येते की, वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांच्याकडून वृक्षतोड परवाना घेऊनच वृक्षतोड करावी.
व वाहतुक पास घेऊन वाहतुक करावी. विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतुक केल्यास वनविभागाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
(तुकाराम विठ्ठल जाधवर)
वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला
0 Comments