google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...बंद खोलीतून भयंकर वास येऊ लागला, आंत जाऊन पाहिलं तर 8 वर्षांच्या चांदनीचे पाय बांधलेले होते आणि....

Breaking News

खळबळजनक...बंद खोलीतून भयंकर वास येऊ लागला, आंत जाऊन पाहिलं तर 8 वर्षांच्या चांदनीचे पाय बांधलेले होते आणि....

  खळबळजनक...बंद खोलीतून भयंकर वास येऊ लागला, आंत जाऊन पाहिलं तर 8 वर्षांच्या चांदनीचे पाय बांधलेले होते आणि....


मुंबई जवळील वसईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 8 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात चिमुरडीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील वसई फाटा येथे एका 8 वर्षीय लहानगीचा मृतदेह बंद घरातील मोरीत आढळून आला आहे. तिचे पाय नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीतहोते. चांदनी अशोक साह असं आठ वर्षीय मुलीच नाव आहे. 

ती जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहे. ही चिमुरडी 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घराजवळील दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेली होता. त्यानंतर ती घरी आलीच नाही. 

अचानक चांदनी बेपत्ता झाली होती. दिवसभरात मुलीचा शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. अखेरीस त्याच दिवशी रात्री वडिलांनी पेल्हार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला होता.

बेपत्ता चांदनीचा सर्वत्र शोध घेतला जात होता. यासाठी चांदनीला शोधून आणणाऱ्या व्यक्तीला 20 हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मागील 3 दिवसांमध्ये तिचा कुठेच पत्ता लागला नाही. 

पण आज 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मागील एका चाळीतबंद रुममध्ये घाण वास येत होता. शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बंद रुमचा दरवाजा तोडून प्रवेश केला

 असता मोरीत एका प्लास्टिकच्या गोणीत पाय बांधलेल्या अवस्थेत चांदनीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments