google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोला ते महूद रस्त्याच्या कामाचे खा.नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन - आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

मोठी बातमी...सांगोला ते महूद रस्त्याच्या कामाचे खा.नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन - आमदार शहाजीबापू पाटील

मोठी बातमी...सांगोला ते महूद रस्त्याच्या कामाचे खा.नाईक-निंबाळकर


यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन - आमदार शहाजीबापू पाटील 

सांगोला :सांगोल्याहून अकलूज,फलटण,पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी सोईस्कर असणारा सांगोला-महूद (राष्ट्रीय महामार्ग क्र.एन.एच.९६५ जी) हा रस्ता अनेक ठिकाणी उखडल्यामुळे व मोठमोठे खड्डे पडल्यामुळे 

या मार्गावरुन वाहने चालविताना वाहन चालकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत होती.या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात सतत होत होते.

या रस्त्याचे काम लवकर व्हावे, ही मागणी लक्षात घेवून याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात आला असून मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असणार्‍या दुहेरी

 वाहतुकीच्या सुमारे १० मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

या कामाबाबत सविस्तर माहिती देताना आम.शहाजीबापू पाटील म्हणाले की,केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत “राष्ट्रीय महामार्ग क्र.एन.एच.९६५ जी” या सांगोला-महूद रस्त्याचे हे काम होत 

असून सन २०२२-२३ च्या वार्षिक योजनेमध्ये या कामाचा समावेश करण्यात आला आहे. या कामास दि. १६ फेब्रुवारी २०२३ ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.रस्त्याची एकूण लांबी २४.०६० कि.मी.आहे. या रस्त्याच्या कामासाठी बांधकाम क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. 

त्यातून पुणे येथील कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीस हे काम मिळाले आहे.या रस्त्याच्या कामासाठी एकंदरीत सबग्रेड, जीएसबी,डीएलसी,पीक्यूसी असे एकंदरीत ४ थर देण्यात येणार आहेत.त्यामुळे रस्त्याची उंची ही १ मीटर पेक्षा अधिक असणार आहे.

या मार्गावर एकंदरीत ३ मोठे पूल असून महूद-अकलूज मार्गावर १० मीटरचे ६ गाळे असणारा पूल, साडेदहा मीटरचे ८ गाळे असणारा वाकी-शिवणे गावाजवळील पूल तर, २२ मीटरचे ३ गाळे असणारा चिंचोली

 तलावाजवळचा पूल असे ३ मोठे पूल उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, महूद गावाजवळ,निरा उजवा कालव्यावर साखर कारखान्याजवळ आणि शिवणे येथे असे एकूण ३ छोटे पूल बांधले जाणार आहेत.

या मार्गावर सांगोला हद्दीत,शिवणे, वाकी व महूद असे एकूण २.१५५ कि.मी.लांबीचे गटार बांधण्यात येणार आहे,असे सांगून आम.शहाजीबापू पुढे म्हणाले की,या रस्त्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने ढाळेवाडी पाटी (महूद नजीक) सामुग्रीची जमवाजमव केलेली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये या मार्गावरील चिंचोली तलावाजवळील व वाकी-शिवणे येथील मोठ्या तसेच छोट्या पुलांचे काम हाती घेण्यात येणार आहे.

आता लवकरच या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याने या मार्गावरुन नेहमी ये-जा करणार्‍या नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असल्याचेही आम.शहाजीबापू यांनी यावेळी सांगीतले.

भूमिपूजनासाठी उपस्थिती :

सांगोला-महूद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम.शहाजीबापू पाटील असतील. तर,प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,माजी नगराध्यक्ष पी.सी. झपके,

 माजी नगराध्यक्ष रफीकभाई नदाफ,जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड,भाजपाचे माढा लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार,शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे 

तानाजी काका पाटील,मधुकर बनसोडे,समीर पाटील,आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते इ. उपस्थित राहणार आहेत.

असा असेल “सांगोला-महूद” रस्ता राष्ट्रीय महामार्ग :

* मार्ग क्रमांक – एन.एच.९६५ जी

* मार्गावरील गावे – सांगोला,शिवणे,वाकी व महूद

* रस्त्याची लांबी – २४.०६० कि.मी.

* दुहेरी वाहतुकीसाठी १० मीटर रुंदीचा काँक्रिटीकरण रस्ता           * प्रशासकीय व तांत्रिक मान्यता रक्कम – २५३.७८ कोटी रुपये

* कंत्राटाची रक्कम – ११३.५० कोटी

* कंत्राटदाराचे नांव – कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.पुणे

* मोठे ३ पूल – चिंचोली तलाव,वाकी-शिवणे व महूद

* छोटे ३ पूल – शिवणे,साखर कारखान्याजवळ व महूद

* बससाठी निवारा शेड –                     सांगोला,चिंचोली फाटा, शिवणे,वाकी, साखर कारखाना,महूद हॉस्पिटल व महूदमध्ये २.

Post a Comment

0 Comments