३ अपत्य असतानाही माहिती दडवून शासनाची फसवणूक केले प्रकरणी हतीद गावचे पोलीस पाटील यांचे बडतर्फीचे आदेश !
ज्याअर्थी, मंगळवेढा उपविभागातील सांगोला व मंगळवेढा तालु्क्यातील रिक्त पोलीस पाटील पदांचे भरती प्रक्रीया राबविणेत येवून दिनांक ०८/११/२०१७ रोजी जाहिरनामा प्रसिध्द करुन
सदर जाहिरनामातील अटी व शर्ती नुसार अर्ज प्राप्त करुन घेऊन त्यांची दिनांक १०/१२/२०१७ रोजी लेखी परीक्षा व दिनांक १५/१२/२०१७ व दि. १६/१२/२०१७ रोजी तोंडी परिक्षा प्रक्रिया जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
त्यानुसार पोलीस पाटील निवड प्रकीया पुर्ण करुन इकडील क्रमांक / आरटीएस / एसआर / ७० / २०१७ दिनांक ३०/१२/२०१७ अन्वये पोलीस पाटील हातिद ता. सांगोला या पदावर दि.३०/१२/२०१७ पासून रुजू झाल्या आहेत.
श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर यांनी जाहिरनामातील अटि व शर्ती नुसार दिनांक १५/११/२०१७ रोजीच्या रुपये १०० रुपयेचे स्टॅप पेपरवर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करुन त्यांत दोन अपत्ये नमुद केलेले आहे.
ज्याअर्थी, श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना दिनांक ०३ / ०३ / २०२० रोजी झालेले
तिसरे अपत्ये , जन्मानंतर लगेच श्री प्रदिप लालासो घाडगे रा.हातिद ता. सांगोला यांनी दि. २५/०६/ २०२० तक्रारी अर्ज देऊन अर्जात हातिद पोलीस पाटील यांनी लहान कुटुंबाचे कायदयाचे उल्लंघन केलेले आहे. अशी तक्रार दाखल केली
असता सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तहसिलदार सांगोला यांचेकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला असता तहसिलदार सांगोला यांनी दिनांक २३/०११/२०२० रोजी अहवाल सादर करुन मौज हातिद येथील पोलीस पाटील यांना तीन अपत्ये पैकी
एक अपत्य कुमारी राजेश्वरी धनाजी खंडागळे, वय वर्षे ८ महिने हिस नोंदणीकृत दत्तक देणेत आले आहे. असे नमुद करुन अहवाल सादर केलेला आहे. तद्नंतर श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर या पदावर
नियुक्ती झाल्यानंतर त्यांना दिनांक ०३/०३/२०२० रोजी झालेला तिसर अपत्ये जन्मानंतर लगेच श्री राहुल महादेव मंडले रा. हातिद ता. सांगोला यांचा दि.०५/१२/२०२२ व तसचे श्री. दादा गणेश यांचे निवेदन दि. २३/०६/२०२० यांचा तक्रारी अर्ज प्राप्त झालेला आहे.
सदर अर्जात हातिद पोलीस पाटील यांना ०३ तीन अपत्य असून त्यांची नियुक्ती रद्द करणेबाबत तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रारी अनुषंगाने तहसिलदार सांगोला चौकशी केली
आणि श्री.धनाजी नामदेव खंडागळे यांना पोलीस पाटील पदी नियुक्त झालेनंतर ३ रे अपत्य झाले असल्याचे कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द झाले आहे. सदर अहवालच्या अनुषंगाने श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर इकडील कार्यालयीन
नोटीस क्र.आस्था/कावि/१९५८ / २०२३ दिनांक ११/१०/२०२३ नुसार सविस्तर कळवून या कार्यालयात समक्ष लेखी म्हणणे सादर करणेस कळविले असता त्यांनी दिनांक १६/१०/२०२३ रोजी कार्यालयात
उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर केलेले असून त्यांत त्यांनी पोलीस पाटील म्हणुन माझी नेमणुक सन २०१८ साली झालेली आहे. त्यावेळेस मला दोनच अपत्ये होती. त्यावेळेस देखील माझी पत्नी व दोन मुली असेच लहान कुटुंब होते व आजही आहे.
त्याबाबतचा उल्लेख माझे रेशनकार्डवर देखील आहे. दिनांक ०३/०३/२०२० रोजी झालेले अपत्य जन्मानंतर लगेच मी दत्तकपत्र कायद्यातील तरतुदी व नियमानुसार दुय्यम निबंधक कार्यालय सांगोला येथे
दत्तकपत्र नोंदणी करून दत्तक दिलेले आहे. असे लेखी म्हणणेत नमुद केलेले आहे. सदर प्रकरणी तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारी अर्जात नमुद केलेले बाबी व तहसिलदार सांगोला यांचा वस्तीस्थिती अहवाल
आणि श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता. सांगोला जि.सोलापूर यांचा दिनांक १६/१०/२०२३ रोजीचा लेखी खुलासा पाहता त्यांना पोलीस पाटील नियुक्ती देते वेळेस त्यांना दोनच अपत्ये होती.
त्यावेळेस देखील त्यांची पत्नी व दोन मुली असेच लहान कुटुंब होते व आजही आहे. त्याबाबतचा उल्लेख त्यांचे रेशनकार्डवर देखील आहे. दिनांक 03/03/2020 रोजी झालेले ३ रे अपत्य जन्मानंतर लगेच
त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय सांगोला येथे दत्तकपत्र नोंदणी करून दत्तक दिलेले आहे. दत्तक मुलाचे पालक तत्व त्यांचे नैसर्गिक पालकाकडे येते त्यामुळे श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर यांना तिन अपत्य असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर यांनी (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ मधील नियम ६ नुसार सदर नियमातून शिथीलता देण्याची विनंती कली आहे.
मात्र श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर यांच्या प्रकरणी (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ मधील नियम ६ तरतुदीनुसार शिथिलता देण्याचे कोणतेही परिस्थितीजन्य कारण अथवा वस्तीस्थिती दिसून यते नाही.
श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर यांना शासन सेवेत नियुक्तीपुर्वीच दोन अपत्य नियुक्तीनंतर एक अपत्ये असे एकूण तीन अपत्ये असून देखील त्यांनी सदर वस्तुस्थिती लपवून ठेवली
आणि शासनाची फसवणूक करुन शासन सेवेत कार्यरत आहे. यास्तव श्री.धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर या सदर नियमातून शिथिलता देण्यासाठी पात्र ठरत नाहीत.
त्याअर्थी, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ चे कलम ९ मधील तरतुदीनुसार व शासनाकडील परिपत्रक क्र. बी.व्ही पी.०६०९/प्र.क्र.१६०/ पोल-८ दि. १० जुन
२००९ रोजीचे परिपत्रकातील तरतुदीमधील नुसार गावातील संबंधित पोलीस पाटलांविरुध्द महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 मधील कलम (1) (इ) नुसार नोकरीतून काढून टाकणे,
पण त्यामुळे भविष्यकाळात शासनाच्या अधीन नोकरी करण्यास तो अपात्र ठरणार नाही किंवा 9 (फ) नुसार नोकरीतून बडतर्फ करणे त्यामुळे भविष्य काळात शासनाच्या अधिन नोकरी करण्यास सामान्यतः अपात्र ठरेल,
अशा प्रकारची शिक्षा लादण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन कारवाई करावी. असे नमुद असल्याने श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता. सांगोला जि.सोलापूर यांना
पोलीस पाटील या पदावरुन सेवेतून बडतर्फ करणे मात्र भविष्यात शासकीय नोकरी मिळण्याच्या दृष्टीने ही अनर्हाता ठरेल या शिक्षेस पात्र असल्याने मी, उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा मला प्रदान करणेत आलेले
शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनिय १९६७ मधील तरतुदी नुसार श्री. धनाजी नामदेव खंडागळे पोलीस पाटील हतिद ता सांगोला जि.सोलापूर यांना या आदेशच्या दिनांकापासून पोलीस पाटील हातिद ता. सांगोला या पदावरुन सेवेतून बडतर्फ करण्यात येत आहे.
0 Comments