google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना .... फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून सहा जणांचा मृत्यू..

Breaking News

धक्कादायक घटना .... फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून सहा जणांचा मृत्यू..

धक्कादायक घटना .... फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून सहा जणांचा मृत्यू.. 


तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मांडळ येथील शिक्षक धनराज नगराज सोनवणे (वय ५५) रा. बेटावद व योगेश धोंडू साळुंखे रा अर्थे ता शिरपूर हल्ली मुक्काम पिंपळे रोड 

अमळनेर या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडीमध्ये व दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब एक गाडीत अशा दोन चारचाकींवर राजस्थान फिरायला जात असताना १३ रोजी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला धडक दिल्याने धनराज सोनवणे, 

त्यांची पत्नी सुरेखा बाबूलाल मैराळे उर्फ सुरेखा धनराज सोनवणे (वय ५०), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (वय ५ वर्षे), गायत्री योगेश साळुंखे (वय ३० वर्ष), प्रशांत योगेश साळुंखे (वय ७ वर्ष), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय १ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. 

सुरेखा सोनवणे (मैराळे) या गलवाडे येथे जिल्हा परिषद शिक्षिका होत्या. गेल्याच महिन्यात त्यांची मांडळ येथे समायोजनात बदली झाली होती. मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून

 तेथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांशी बोलणे केले. अपघात होताच सुरेखा सोनवणे (मैराळे) या जीवंत होत्या. त्यांना रुग्णवाहीकेने पालमपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गाडी बदलल्याने योगेश साळुंखे बचावले…

घटनेच्या अर्ध्या तासापूर्वी दिनेश सूर्यवंशी यांनी फोन करून योगेश साळुंखे यांना सोनवणे यांच्या वाहनातून त्यांच्या वाहनात बसायला बोलावले. सोनवणे यांचे वाहन पुढे चालत होते व सूर्यवंशी यांचे वाहन मागे होते. घटनेपूर्वी काही वेळेआधी सोनवणे यांनी वाहन

 चालवताना गाडी खड्ड्यात टाकली तेव्हा सूर्यवंशी व साळुंखे यांनी फोन करून त्यांना सावध वाहन चालवण्याचा फोन केला. आणि काही वेळात दुर्दैवी घटना घडली. वाहन बदलवल्याने योगेश साळुंखे बचावले, मात्र कुटुंब उध्वस्त झाले आहे.

Post a Comment

0 Comments