google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात दसरा व दिवाळीनिमित्त भारत दाळ योजनेतंर्गत प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ वाटप नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद - भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत

Breaking News

सांगोल्यात दसरा व दिवाळीनिमित्त भारत दाळ योजनेतंर्गत प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ वाटप नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद - भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत

 सांगोल्यात दसरा व दिवाळीनिमित्त भारत दाळ योजनेतंर्गत प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी


पाच किलो हरभरा दाळ वाटप नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद - भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून 

दसरा व दिवाळीनिमित्त भारत दाळ योजनेतंर्गत प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ विक्रीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

 या अल्प दरातील दाळ वाटपाचा सांगोला तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.  

गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे व देशाच्या इतिहासात सर्वांत ऐतिहासिक निर्णय घेणारे आणि सर्वांसाठी आदर्श ठरलेले नेतृत्व नरेंद्र मोदी यांचे आहे.

 भ्रष्टाचारमुक्त गरीब कल्याणाच्या योजना आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवणे हेच मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या नऊ वर्षात गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम केले आहे.  

केंद्र सरकार व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत जनतेला सणासुदीच्या काळात स्वस्तात चणाडाळ मिळावी यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी हा उपक्रम राबवला. 

यात ग्राहकांना त्यांनी अवघ्या ६० रुपये किलो दराने चणाडाळ दिली आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाकडून भारत डाळ या नावाने सर्वसामान्य गोरगरीब जनतेस परवडेल अशा दराने चना डाळीची विक्री सुरु केली आहे. 

१ किलो बॅगसाठी ६० रुपये प्रतिकिलो या अनुदानित दराने वाटप करण्यात येत आहे. सांगोला तालुक्यातील महिला व नागरिकांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. 

सांगोला शहरातील वाढेगांव नाका येथील जोतिर्लिंग कॉम्प्लेक्स मधील भाजप कार्यालयात सदरची दाळ वाटप सुरू असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments