google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काम बंद आंदोलन

Breaking News

सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काम बंद आंदोलन

सांगोला ग्रामीण रुग्णालयातील  कंत्राटी अधिकारी


आणि कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काम बंद आंदोलन 

राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध विभागात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे .त्याला पाठिंबा देण्यासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयातील विविध विभागातील अधिकारी व

 कर्मचारी यांचे मार्फत काम बंद आंदोलनाचे निवेदन वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गेल्या वीस वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. 

आझाद मैदानावर पार पडलेल्या आक्रोश मोर्चामध्ये आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन लेखी स्वरूपात जोपर्यंत प्राप्त होत नाही ,तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. इतर राज्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन केले आहे. 

त्याच पद्धतीने राज्य शासनाने देखील लवकरात लवकर समायोजन करण्याचा निर्णय घ्यावा व समान काम समान वेतन देण्यात यावे अशी मागणी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या काम बंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला बसणार आहे…. 

यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शेडगे, डॉ. प्रथमेश लोहकरे, डॉ.सय्यद, डॉ. देवदत्त पवार, डॉ.सुशीलकुमार शिंदे ,डॉ. निखत इबुसे ,डॉ. सुषमा फाटे, डॉ. विदुला बाड ,

आयुष् वैद्यकीय अधिकारी डॉ. जावळे, औषध निर्माता अधिकारी श्री. समाधान शिवशरण ,श्री .सचिन कांबळे, श्री .जगदीश पाडवी, अमृता रसाळ ,नाझिया मुजावर ,एएनएम. सुधा गायकवाड, सिंधू सरगर, जयश्री जगदाळे, रेश्मा वाघमारे ,

अश्विनी काशीद, एनसीडी जीएनएम रविता कोकणे ,एमबीयुएस च्या जी एन एम . मयुरी उगडे, रंजना पावरा, आरसीएच च्या एएनएम शहनाज खलिफा, सुषमा आलदर, अंजली दंडवते, पुष्पा पाटोळे, एक्स-रे टेक्निशियन श्री. ओंकार कोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments