खळबळजनक ... चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू
चित्रपटसृष्टीत आजकाल अनेक दुखद घटना घडत आहेत. दोन दिवसापूर्वी मल्यालम चित्रपटसृष्टीतील दोन अभिनेत्रींचा मृत्यू झाला होता. पण आता आपल्या शेजारील देशातील म्हणजे
बांग्लादेश मधील अभिनेत्री हुमैरा हिमू यांचे निधन झाले आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
हुमैरा हिमू ही बांग्लादेशमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हुमैरा काही दिवसांपूर्वी आजारी होती. त्या दिवशी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर तिला बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान पोलीसांनी दिलेल्या
माहितीनुसार, हुमैरा हिमूने २ नोव्हेंबरला दुपारी प्रियकराशी झालेल्या वादानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला मृत घोषित करण्यापुर्वी त्या व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढल्याचाही संशय आहे.
हुमैरा हिमूच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या मानेवर जखमेच्या खुणा दिसल्यानंतर डॉक्टरांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिस येण्यापूर्वीच त्याच्यासोबत असलेला एक मित्र हॉस्पिटलमधून निघून गेला होता आणि सध्या त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
अभिनेत्री हुमेराने ‘छायाबिथी’ या चित्रपटातून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी ‘डीबी’, ‘संघट’, ‘चेअरमन बारी’, ‘बत्तीघोर’ आणि ‘शोनेना ती शोनेना’ यासह अनेक
नाटकांमधून टेलिव्हिजन पडद्यावर काम केले. या सर्वांशिवाय ती २०११ मध्ये मोरशेदुल इस्लाम दिग्दर्शित ‘अमर बंधू राशिद’ या चित्रपटातही दिसली होती.
0 Comments