खळबळजनक घटना...सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यानं चक्क उत्तरपत्रिकेत लिहिलं 'एक मराठा कोटी मराठा'
मराठा आरक्षणाचा चेंडू मनोज जरांगेंनी सरकारच्या कोर्टात टाकला आहे. उपोषण मागे घेतलं तरी त्यांची धग अद्याप संपलेली नाही
. मराठा आरक्षणाचा लढा हा मोर्चा, उपोषणानंतर आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहाेचला आहे.आरक्षण मिळाल्याशिवाय आपल्याला भवितव्य नाही, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये ठळकपणे होताना दिसते.
उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल
सध्या शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यास आरक्षणाची मागणी चक्क उत्तरपत्रिकेतून केल्याने उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाचा भुवया उंचावल्या.
ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानिमित्ताने मनोज जरांगेंनी मराठा युवकांना घातलेली साद उत्तरपत्रिकेतून उमटली आहे.
बीबीदारफळ (सोलापूर) येथील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दोन तारखेला राज्यशास्त्राचा पेपर होता. त्याने उत्तरपत्रिकेत पहिल्या पानावर प्रश्नाचे उत्तर न लिहिता सुरुवातच "जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभूराजे" अशी केली आहे.
पहिल्याच पानावर त्याने चक्क "एक मराठा कोटी मराठा" ही घोषणा ठळकपणे मोठ्या अक्षरात लिहिली आहे. राज्यभर या उत्तरपत्रिकेची चर्चा सुरू आहे.
यंत्रणा कामाला लागली...
मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घेतल्याने सरकारने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या दोन महिन्यांत मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिला आहे. कुणबी दाखल्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
0 Comments