google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ...मारहाणीची फिर्याद दाखल करून घ्यावी.आणि आरोपीना मदत करणा-या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ; संभाजी मंडले यांची मागणी ! ऐन दिपावलीच्या सणात संभाजी मंडले यांच्या कुटुंबावर उपोषण करण्याची वेळ

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ...मारहाणीची फिर्याद दाखल करून घ्यावी.आणि आरोपीना मदत करणा-या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ; संभाजी मंडले यांची मागणी ! ऐन दिपावलीच्या सणात संभाजी मंडले यांच्या कुटुंबावर उपोषण करण्याची वेळ

ब्रेकिंग न्यूज ...मारहाणीची फिर्याद दाखल करून घ्यावी.आणि आरोपीना मदत करणा-या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ; संभाजी मंडले यांची मागणी !


ऐन दिपावलीच्या सणात  संभाजी मंडले यांच्या कुटुंबावर उपोषण करण्याची वेळ

सांगोला प्रतिनिधी ;  एखतपूर (मंडलेवस्ती) ता. सांगोला येथील  संभाजी सुब्राव मंडले हे वडिलांचे नावे असणाऱ्या शेत जमीन गट नंबर १०४४/१ ब व ९८१/४ मध्ये झोपडी घालून विधवा आई,पत्नी दोन मुलांसोबत राहत असून,त्यांच्या वडिलार्जित समाईक शेत जमिनीतील पाईपलाईनच्या वादातून

 १. संतोष आत्माराम चौगुले २. प्रकाश आत्माराम चौगुले ३. विशाल दगडू चव्हाण ४. लालासो दगडू चव्हाण ५. विलास दशरथ चव्हाण ६. कुमार दशरथ चव्हाण ७. भैय्या बसलिंग जाधव ८. नितीन बसलिंग जाधव ९. कैलास सोपान चव्हाण

 १०.अमोल अर्जुन जाधव १९. सचिन सोपान चव्हाण यांच्यासह इतर ५ ते ६ अनोळखी लोकांनी दि. २३/८/२०२३ रोजी संभाजी मंडले यांच्या  कुटुंबातील सदस्य १ . पत्नी बाई संभाजी मंडले २. मेहुणे सिध्देश्वर शरद जाधव ३. बहिण राधा सिध्देश्वर जाधव ) यांना लोखंडी गजाने, 

कोयत्याने, लाकडी दांडक्याने लेटर पाईपने बेशुद्ध पडेपर्यंत जिवे मारण्याच्या हेतूने जबर मारहाण करून जखमी केले होते. सदर घटनेची तक्रार नोंद करण्यासाठी  सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गेलो असताना पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या ठाणे अंमलदार यांनी उपचारासाठी यादी

 देवून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले वरुन ते सर्वजण सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले. येथील डॉक्टरांनी आमच्यावर उपचार केले. आणि सांगितले की आता तुम्ही घरी जावा. तुमचा रिपोर्ट पोलीस घेवून जातात.

आणि तक्रार घेण्यासाठी तुम्हाला बोलवतात. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सांगण्यावरून हे सर्वजन घरी गेले,अनेक दिवस झाल्याने.परंतु त्यांची तक्रार घेण्यासाठी पोलीस येत नाहीत.हे समजल्यावर संभाजी मंडले हे ग्रामीण रुग्णालयात गेले ,

 व त्यांनी डॉक्टरांकडे विचारपूस केली. आमचा रिपोर्ट पोलिस घेवून गेले का ? तेव्हा डॉक्टरांनी सांगितले तुमचा रिपोर्ट पोलिसांनी घेतलेला नाही. तेव्हा तो रिपोर्ट आमच्याकडे द्या अशी मागणी संभाजी मंडले यांनी  डॉक्टरांकडे केली .तेव्हा त्यांना सांगितले की, हा रिपोर्ट तुम्हाला देता येत नाही.

 पोलीसच हा रिपोर्ट घेवुन जावू शकतात. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले. तुमची  तक्रार घेण्यात आली नाही असे सांगण्यात आले. तेव्हा तक्रार नोंदवून घेण्यासाठी विनंती केली. परंतु वारंवार विनंती करून ही  तक्रार घेण्यात आली नाही. 

त्या दरम्यान  एखतपूर बिटचे पोलीस कर्मचारी सावंजी हे वेगवेगळ्या लोकांच्या मोबाईल नंबर वर फोन करून संभाजी मंडले हे पोलीस स्टेशनला हजर व्हावे. असे सांगत होते. तेव्हा त्यांना विचारले की, आमच्या विरुद्ध कोणाची तक्रार वगैरे आहे काय ?

 तेव्हा त्यांनी त्या बाबत कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.उलट मारहाण करणा-या आरोपी संतोष आत्माराम चौगुले यांच्या सांगण्यावरून पोलीस कर्मचारी सावंजी व पोलीस कर्मचारी गोडसे यांनी संभाजी मंडले

 यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना संभाजी मंडले यांच्या  शेत जमिनीत चौगुले यांना घेवून येवून संभाजी मंडले यांच्या मालकीची पाईपलाईन उकरून त्या पाईपलाईनला चौगुले यांची पाईपलाईन जोडण्यासाठी आले होते. 

तेव्हा संभाजी मंडलेयांच्या  कुटुंबातील सदस्यांना पोलीस कर्मचारी सावंजी व गोडसे यांनी धमकावून संतोष चौगुले यांची पाईपलाईन जोडण्यासाठी मदत करून आपल्या

 अधिकाराचा दुरुपयोग करून कार्यालयीन कर्तव्यात कसूर केला आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी सावंजी व गोडसे यांनी मारहाणीतील प्रमुख आरोपी संतोष चौगुले यांना मदत केले प्रकरणी त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी. 

 मारहाणीची रितसर तक्रार दाखल करून घेण्यात यावी.या मागणीसाठी संभाजी मंडले हे संपूर्ण कुटुंबासोबत दि.१५/११/२०२३ रोजी पासून सांगोला तहसिलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.

Post a Comment

0 Comments