मोठी बातमी... ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण !
मोहोळ विभागाचे उपअधीक्षक आणि मोहोळचे प्रभारी यांच्यावर कारवाई करा - राजेश खरे
प्रतिनिधी : सोलापूर : पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सह संपर्क प्रमुख तथा राज्य कार्यकारणी सदस्य राजेश खरे यांनी निवेदन देवून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मोहोळ येथे ड्रग्ज निर्मिती होत असल्याचे स्पष्ट झाले
असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे पोलीस उपअधीक्षक तसेच एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या मोहोळ तालुक्यातील पोलीस अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात गाजत असलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीतील मयूर इंड या कारखान्याच्या परिसारातून कोट्यवधी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे.
चिंचोळी एमआयडीसीमधील सेंकी केमिकल्स या कारखान्याशेजारी असलेल्या प्लॉट नंबर सी १८० मधील मयूर इंड या कारखान्याच्या आवारातून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे,
मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या स्वामी समर्थ कंपनी केमिकल्स नावाच्या कारखान्यातून नाशिक पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज व कच्चा माल जप्त केला आहे.
या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस स्टेशनचा गोपनीय विभाग विभाग झोपा काढत होते का ? की फक्त हप्ते घेण्यामध्ये पोलीस विभाग दंग होते असा सवाल जनतेमध्ये उपस्थित होत आहे.असे निवेदनात म्हटले आहे आणि निवेदनाची तात्काळ दखल घेवून जबाबदारी निश्चित
करून उप अधीक्षक आणि एमआयडीसी परिसराचा चार्ज असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास १५/११/२३ रोजी पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या कार्यलयासमोर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राजेश खरे यांनी दिला आहे.
0 Comments