धक्कादायक प्रकार...टेंभुर्णी बस स्टॅन्डमध्ये भरदिवसा अपहरण करून जबरी चोरी करणा-या अटटल
चोरांची टोळी २४ तासाचे आत जेरबंद - टेंभुर्णी पोलीस ठाणे व पंढरपुर शहर पोलीस ठाणे डिबी पथकाची संयुक्त कारवाई
टेंभुर्णी पोलीस ठाणे गुरनं ६८८ / २०२३ भादवि कलम ३९४,३६५, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयाची हकीकत अशी की, दिनांक ०४/०६/२०२३ रोजी यातील फिर्यादी हा कुरियरचे कामकाज करून टेंभुर्णी येथून इंदापूर येथे जाणेकरीता टॅभुणी बसस्टॅन्ड येथे गेलेनंतर तो बसस्टॅन्डचे बाजूचे आवारात लघवीला गेल्यानंतर
अनोळखी ४ आरोपींनी त्याला "तु आमचे पैसे बुडवून चालला काय" असे म्हणून शिवीगाळी करून हाताने मारहाण करून तेथून त्यांचे कारमध्ये जबरदस्तीने बसवून फिर्यादीला कुर्डुवाडीचे जवळ लऊळ गावाचे शिवावारात आडरानात सोडून निघून गेले
व त्याला मारहाण करून त्याचे कडील १) ६,२५,०००/- रूपये रोख रक्कम असलेली निळ्या काळया रंगाची रॉकबॅग, त्यामध्ये ५०० रूपये दराच्या भारतीय चलनी नोटा २४०,०००/- रू किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, खडा असलेली वापरती
किं.अं. ३) १०,०००/- रू चे दोन स्किन टच मोबाईल पैकी एक रेडमी कंपनीचा व दुसरा वनप्लस कंपनीचा, रेडमी मोबाईलमध्ये एअरटेल कंपनीचे सीम नं. ९३७३३६०९९९ व वनप्लस मोबाईलमध्ये जीओ कंपनीचे सीम नं. ८२३७५४८४६१ असे आहेत, मोबाईल वापरते
किं.अं. असा एकूण ६,७५,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून पळून गेले आहेत. म्हणून वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून दिनांक ०५/११/२०२३ रोजी सदर गुन्हा गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा दाखल झालेनंतर तात्काळ मा. पोलीस अधिक्षक श्री. सरदेशपांडे सो, सोलापूर ग्रामीण मा. अप्पर पोलीस अधिक्षक
श्री. हिंम्मत जाधव सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग श्री. अजित पाटील सोर, टेंभुर्णी पोलीस ठाणेचे मा. पोलीस निरिक्षक श्री. दिपक पाटील सो यांनी घटनास्थळास भेट देवून
सदर गुन्हयाचे तपासिक अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोउपनि कुलदिप सोनटक्के तसेच व त्यांचे पथकातील पोहेकॉ / ९५ विलास नलवडे, पोहेकॉ / १७४६ संदिप गिरमकर, पोना / १५७६ विनोद साठे, पोकॉ/ ११८५
निखील पवार यांना तपासाबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोसई कुलदिप सोनटक्के व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी अहोरात्र चोरांच्या टोळींची गोपनीयपणे तांत्रिक माहिती
काढून त्यांचे बुद्धीकौशल्याने तांत्रिक विश्लेषण करून तपास केला असता सदर आरोपींनी फिर्यादीस टेंभुर्णी बसस्टॅन्ड मधुन अपहरण करून कंदर- केम- कुर्डुवाडी मार्गे नेवुन लऊळ गावाचे शिवारातील आडरानात
नेवुन सोडल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींचा पुढील मार्गाबाबत अधिक तपास करून तसेच त्यांचे मार्गावरील व टेंभुर्णी बस स्टॅन्ड, पंढरपुर बसस्टॅन्ड मधील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या आधारे टेंभुर्णी पोलीस ठाणे व पंढरपुर शहर पोलीस
ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक तात्काळ यशवंतनगर, अकलुज येथे रवाना होवुन सदर आरोपींचा तांत्रिक माहीतीच्या आधारे शोध घेवून आरोपी ४ आरोपीत यांना २४ तासाचे आतच शिताफीने पकडले.
तसेच त्यांनी गुन्हा करतांना वापरलेली ग्रे रंगाची इर्टिगा कार नं. MH-42 /K-3901 ही जप्त केली..सदर आरोपींना मा. न्यायालयाने सदर आरोपींना दिनांक १०/११/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.
सदर आरोपीकडे तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के बुध्दीकौशल्याने तपास करून आरोपी क १ व २ यांचे कडुन फिर्यादीची
चोरलेला मुद्देमालापैकी ३,२५,०००/- रूपये रोख रक्कम जप्त केली आहे व उर्वरित रोख रक्कम, सोन्याची अंगठी व २ मोबाईल असा मुददेमाल त्यांचेकडे तपास करून तो हस्तगत करण्याचे अनुशंगाने टेंभुर्णी पोलीस ठाणेचे पथक प्रयत्न करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. सरदेशपांडे सो सोलापूर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिंम्मत जाधव सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी
करमाळा उपविभाग श्री. अजीत पाटील सो, टेंभुर्णी पोलीस ठाणेचे मा. पोलीस निरिक्षक श्री. दिपक पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाणेचे डिबी पथकाचे प्रमुख पोसई कुलदिप सोनटक्के व त्यांचे
पथकातील पोहेकॉ / ९५ विलास नलवडे, पोहेकॉ / १७४६ संदिप गिरमकर, पोना / १५७६ विनोद साठे, पोकॉ/ ११८५ निखील पवार तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर उपविभाग श्री. भोसले सो पंढरपुर पोलीस ठाणेचे मा. पोलीस निरीक्षक
श्री. अरुण फुगे, पोसई प्रशांत भागवत, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकॉ / ४१९ शरद कदम, पोहेकॉ / १०६३ बिपीनचंद्र ढेरे, पोहेकॉ / २२१ प्रसाद औटी, पोहेकॉ / १७८९ सचिन हेंबाडे, पोकों / १२१६ शहाजी मंडले, पोकॉ/ २१९० समाधान माने यांनी पार पाडलेली
0 Comments