google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्युज .... सोलापुरात अवकाळी पावसाने नाल्यात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू; पिकाची प्रचंड हानी ..

Breaking News

ब्रेकिंग न्युज .... सोलापुरात अवकाळी पावसाने नाल्यात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू; पिकाची प्रचंड हानी ..

ब्रेकिंग न्युज .... सोलापुरात अवकाळी पावसाने नाल्यात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू; पिकाची प्रचंड हानी ..


सोलापूर जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला.

 यामुळे सखल भागात पाणी साचले होते. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज गायब झाली होती. या मुसळधार पावसामुळे एक दुर्दैवी घटना सोलापूर शहरात घडली आहे. शहरातील कुंभार वेस परिसरातील नाल्यातून एक तरुण बाईकसह वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

काल रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. सलाम दलाल (वय ३५) असे या तरुणाचे नाव आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ही दुर्घटना घडली. काल मध्यरात्री झालेल्या पावसात कुंभार वेस परिसरातील नाल्यात वाहून गेल्याने दलाल यांचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments