पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये बापलेक या शॉर्ट फिल्म चे पोस्टर लॉन्चिग
सांगोला / (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
राष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी बनविण्यात आलेल्या भिमसेन चव्हाण सर ( पुणे) यांनी दिग्दर्शन केलेल्या हृदयस्पर्शी बापलेक या शॉर्ट फिल्म चे पोस्टर लॉन्चिंग
सर्व कलाकारांच्या व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल य मंगेवाडी येथे दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल येलपले सर तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. सरपंच दत्तात्रय मासाळ व प्रगतशील बागायतदार दत्तात्रय येलपले हे होते.. यावेळी सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती.
काबाडकष्ट करून आपल्या लेकीला आयुष्यात उंच शिखरावर पोहोचवण्यासाठी धडपडणाऱ्या बाप आणि मेहनती मुलीच्या जीवन संघर्षाची कहाणी या शॉर्ट फिल्म मध्ये रेखाटण्यात आली आहे.
लेखक - समाधान सरवदे सर, दिग्दर्शक - भिमसेन चव्हाण सर, डीओपी - अक्षय शिंदे सर, प्रमुख भूमिका - भिमसेन चव्हाण (बाप) व कु. रितिका पाटील ( लेक) यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आहेत.
याच कार्यक्रमात गोळा फेक मधील राष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा दत्तात्रय येलपले आणि पल्लवी दत्तात्रय येलपले यांचा सत्कार बाप लेक टीमच्या वतीने करण्यात आला..
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पायोनियर शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments