धक्कादायक प्रकार...सांगोल्यात तीन महिन्यांपासून परप्रांतीयांकडून डिझेलची चोरी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला येथे गेल्या तीन महिन्यांपासून सांगोला तालुक्यातील एका खडीक्रशन प्लाँटमधून डिझेलची चोरी करून परस्पर विक्री करणाऱ्या चौया परप्रांतीय कामगारांसह एका स्थानिक कामगाराविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
निजामपूर येथील नाथबाबा खडी क्रशर डांबर प्लॉट येथे तीन महिन्यांपासून परप्रांतीय कामगारांनी खडी क्रशर मालकाच्या परस्पर त्यांच्या स्वतः चे आणि भाड्याने घेतलेल्या जेसीबी पोकलेन टिप्पर आदी २२ वाहनांच्या
टाकीमधून सुमारे एक लाख ५६ हजार रुपये किमतीचे १७०० लिटर डिझेलची चोरून विक्री केला. हा प्रकार दि. २७ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता निजामपूर येथे उघडकीस आला.
याबाबत योगेश बाबासाहेब खटकाळे (अकोला, सांगोला) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी खडीक्रशर प्लाँट येथे जाऊन मन्जय गंगासाह (बिहार) या परप्रांतीय कामगाराची झडती घेतली.
त्यावेळी त्यांनी त्याला तुम्ही कोणकोण वाहनांमधील डिझेलची चोरी करीत असता,असे विचारले असता त्याने माझ्यासोबत गजेंद्रकुमार,मुन्ना यादव, राजकुमार हे सर्व
परप्रांतीय आणि अंकुश दबडे (राजुरी) असे सर्वजण मिळून प्लास्टिक कॅनमध्ये डिझेल चोरी करीत असल्याचे म्हटले आहे.फिर्यादीत
0 Comments