अशोक कामटे संघटनेच्या मागणीनुसार रेल्वे विभागाची फेर आढावा बैठक सांगोल्यात संपन्न
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोल्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर भर असल्याचे प्रतिपादन शहीद अशोक कामटे संघटनेच्या प्रतिनिधींनी या रेल्वे प्रश्नांच्या बुधवारी फेरआढावा बैठकीत व्यक्त केले .
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय संघटनेच्यावतीने प्रवाशांच्या व नागरिकांच्या समस्या संदर्भात सोलापूर येथील विभागीय रेल्वे कार्यालयास स्मरणपत्र निवेदन देण्यात आले होते. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
सदर तक्रार व निवेदनाची दखल तात्काळ घेऊन या मध्य रेल्वे विभागातील कार्यालयातील संबंधित अधिकारी , अभियंता डी एम मौर्य ,गणेश वाळके (इंजिनिअरिंग) ,
रेल्वे गुप्त शाखेचे निरीक्षक इर्शाद शेख यांनी समस्या संदर्भात कार्यालयात मीटिंग घेऊन सर्व समस्या व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
मिरज रेल्वे गेट क्रमांक 32 भुयारी मार्गात पाणी साठत असल्याने सदरचा प्रश्न नगरपालिका सांगोला व रेल्वे विभाग यांच्या समन्वयाने कार्यवाही करून सोडविणार आहेत.
या परिसरातील पाणी पाझरत असल्यामुळे हा गंभीर प्रश्न आहे नगरपालिकेचे व येथील बाजूला असणाऱ्या ओढ्यातील बंधाऱ्यामुळे येथील
जमीन सखल भागात पाणी मुरत असल्याने ते पाणी पाझरून सर्व ब्रिज मध्ये उतरत आहे ,त्याठिकाणी सहा इंचाचे काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या .
आवश्यक त्या उपाय योजना करून व महूद रेल्वे गेट क्रमांक 31 बी येथीलही मजबूत काँक्रिटीकरण करून येथील समस्याचे निराकरण तात्काळ करून शहर वासियांची समस्या सुटणार आहे
अशी माहिती रेल्वे विभागाचे अभियंता ढवळे यांनी दिली, प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला.
त्याचबरोबर मैसूर -पंढरपूर रेल्वेचा विस्तार सांगोला पर्यंत करणे, सांगोल्यातून थेट मुंबईकरिता रेल्वे सुरू करण्याचे प्रयत्न व विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांनी
दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा सुरू असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले . कोल्हापूर- कलबुर्गी- कोल्हापूर थांबा लवकरच
अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले ,त्याकरिताचा अहवाल देखील सोलापूर येथील रेल्वे विभागाने सकारात्मक महा व्यवस्थापक कार्यालय मुंबई यांना पाठवल्याचे यावेळी सांगितले.
त्याचबरोबर मिरज रेल्वे गेट भुयारी मार्गात पाणी साठत असल्याने सदरचा प्रश्न नगरपालिका सांगोला व रेल्वे विभाग यांच्या समन्वयाने कार्यवाही करून सोडविणार आहेत अशी माहिती रेल्वे विभागाचे अभियंता यांनी
प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला. त्याचबरोबर सांगोल्यातील रेल्वे विभागाचे समस्या वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयास कळवून प्राधान्याने
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी शहीद कामटे संघटनेचे प्रा प्रसाद खडतरे, तोसिफ शेख, मकरंद पाटील सदस्य व पदाधिकारी मीटिंग वेळेस उपस्थित होते.
0 Comments