google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी अपघात... अकलूजजवळ रुग्णवाहिकेच्या अपघातात तरूण डॉक्टरचा मृत्यू

Breaking News

दुर्दैवी अपघात... अकलूजजवळ रुग्णवाहिकेच्या अपघातात तरूण डॉक्टरचा मृत्यू

दुर्दैवी अपघात... अकलूजजवळ


रुग्णवाहिकेच्या अपघातात तरूण डॉक्टरचा मृत्यू

माळशिरस तालुक्यातील गारवाड पाटीजवळ रूग्णवाहिका आणि टोयोटा मोटारीची धडक बसून घडलेल्या अपघातात एका तरूण

 डॉक्टरचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. वसंत भोसले (वय ३५, रा. अकलूज) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

ते स्वतः टोयोटा मोटार चालवत होते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माळशिरस तालुक्यातील मांडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते कार्यरत होते.

या घटनेची माहिती अशी की,रुग्णवाहीका (एमएच ११ सीएच ९३ २४) ही म्हसवड येथून एका रुग्ण बालकाला घेऊन अकलूजमध्ये रूग्णालयात दाखल करण्यासाठी सायरन वाजवत निघाली होती.

 तेव्हा गारवाड पाटी येथे मांडकीहून अकलूजकडे निघालेल्या टोयोटा मोटारीची (एमएच १० बीए ४३ ४५) रूग्णवाहिकेला पाठीमागून धडक बसली. यात मोटार चालक डॉ. वसंत भोसले हे गंभीर जखमी झाले. 

त्यांना अकलूज येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात टोयाटा मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.

 माळशिरस पोलीस ठाण्यास या अपघाताची माहिती कळविण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 मृत डॉ वसंत भोसले यांच्या पश्चात वृध्द आई-वडील, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. ऐन तारुण्यात त्यांच्या अपघाती मृत्यु झाल्यामुळ वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments