google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात धाडी पडताच पान टपऱ्या पटापट बंद; सांगोल्यात पाच दुकानांवर कारवाई

Breaking News

सांगोला शहरात धाडी पडताच पान टपऱ्या पटापट बंद; सांगोल्यात पाच दुकानांवर कारवाई

सांगोला शहरात धाडी पडताच पान टपऱ्या पटापट बंद; सांगोल्यात पाच दुकानांवर कारवाई

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सांगोल्यात धाडी टाकून पाच पान टपऱ्यांवर केलेल्या कारवाईत दहा हजारांचा पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. 

या कारवाईनंतर अनेक चालकांनी पानटपरी बंद करून तेथून धूम ठोकली.ही कारवाई गुरुवारी सांगोला शहरात महात्मा फुले चौक व अहिल्यादेवी चौकात झाली. 

दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका घेऊन सांगोला शहरातील सर्वच पान टपरी सायंकाळी उशिरापर्यंत बंद असल्याचे चित्र दिसून आले.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे (रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी पानटपरी चालक युवराज गजानन झुरळे,

 योगेश महादेव मिसाळ दोघेही (रा.सांगोला), सिद्धेश्वर पांडुरंग पांढरे, अमोल सुभाष कमले, सतीश प्रभाकर सासणे (तिघेही रा. सनगर गल्ली, सांगोला), 

पुरवठादार निशांत मिसाळ (रा. सांगोला) यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. अन्नसुरक्षा अधिकारी उमेश भुसे, आर. आर. पाटील, अस्मिता टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तसेच गुटखा,पानमसाला, मावा व सुगंधित तंबाखूचे विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करुन त्यांना दिलेल्या आधिकारा नुसार जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून काढलेल्या आदेशाची अवज्ञा केलेली असल्यामुळे भा.द.वि.स कलम १८८,२७३, २७३ व ३२८ चे उल्लंघन केल्याने कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments