google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून कायमस्वरुपी टिकेल असे मराठा आरक्षण द्यावे आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून कायमस्वरुपी टिकेल असे मराठा आरक्षण द्यावे आमदार शहाजीबापू पाटील

 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून कायमस्वरुपी टिकेल असे


मराठा आरक्षण द्यावे आमदार शहाजीबापू पाटील 

 मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी संपुर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

 मराठा समाजाने आजवर लाखोंचे मोर्चे लोकशाही मार्गाने काढुन आपल्या भावना शासनास कळविलेल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री. मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी, जि. जालना येथे आमरण उपोषणाला बसले 

असून त्यांना पाठिंबा देणेसाठी त्यांचे समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात

 ठिकठिकाणी साखळी उपोषण, सर्वपक्षीय गावबंदी, रास्तारोको इत्यादी माध्यमातून आरक्षणाचा लढा शांतातपुर्ण मार्गाने करणेत येत आहेत. 

काही अपवाद वगळता सकल मराठा समाज हा हलाखीचे जीवन जगत असून मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. गुणवत्ता असूनही

मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण नसल्यामुळे न्याय मिळत नाही ही शोकांतीका आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आपणास नम्र विनंती करतो,

 की कायमस्वरुपी टिकेल असे आरक्षण सकल मराठा समाजाला देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे व मराठा समाजाला न्याय देण्यात यावा. तरी आपण याबाबत तातडीने निर्णय घ्यावा

Post a Comment

0 Comments