google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कडलास येथील आमरण उपोषणास डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासह नऊ जणांनी मुंडन करून दिला पाठिंबा

Breaking News

सांगोला तालुक्यातील कडलास येथील आमरण उपोषणास डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासह नऊ जणांनी मुंडन करून दिला पाठिंबा

 सांगोला तालुक्यातील कडलास येथील आमरण उपोषणास डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासह नऊ जणांनी मुंडन करून दिला पाठिंबा


गणपतराव देशमुखांच्या नातवाने मराठ्यांसाठी केले मुंडण !

राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलने,उपोषण केले जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी 

काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे उपोषणास सुरूवात केली होती. ४० दिवसात सरकार आरक्षण देणार होते, 

मात्र सरकार काही करत नव्हते. यामुळे अंतरवाली सराटी येथे जरांगे-पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती देखील खालावली आहे. याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहेत. 

मराठा समाज आता रस्त्यावर उतरू लागला आहे. तर राज्यातील काही भागात साखळी उपोषण सुरू आहे. तर पुण्यातही मराठा समाज आता आक्रमक झाला आहे.

दरम्यान, मराठा समाजासह धनगर समाजही पेटून उठला आहे. यामुळे सांगोल्याच्या शेतकरी कामगार पक्षाने देखील यात उडी घेतली आहे. 

सांगोला तालुक्यातील कडलास येथे शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी स्वत: मुंडन करून दोन्ही 

समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. कडलास  मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कडलास ग्रामस्थांचे साखळी तर दीपक पवार यांचे आमरण उपोषण सुरु आहे. 

मंगळवारी डॉ. देशमुख कडलास येथे गेले असता त्यांनी आंदोलक आणि उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

धनगर आणि मराठा समाज हे कित्येक वर्षांपासून हालाकीचे जीवन जगत आहेत. दोन्ही समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात येत आहे. या समाजात शेती आणि पशुपालन करणे हा मुख्य व्यवसाय आहे. या समाजातील लोकं आजही  

अल्पशिक्षित असल्याने ते आजही नोकरीपासून वंचितांचे जगणे जगत आहेत. इतर समाजाच्या तुलनेत या समाजाची लोकसंख्या ही जास्त आहे. मात्र या समाजाला अनेक वर्षांपासून आरक्षण मिळाले नाही. यामुळे आता धनगर आणि मराठा समाज मागास राहिला आहे. 

यामुळे आता या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी अग्रभागी असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले आहेत. 

यावेळी धनगर-मराठा समाजबांधव, कडलास ग्रामस्थ मंडळी आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कडलास गावात आमरण उपोषण

सांगोल्यातील कडलास गावातील ग्रामस्थांनी साखळी उपोषण केले असून दिपक पवार यांनी आमरण उपोषण केले आहे. तर यासाठी गावातील अनेक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे

Post a Comment

0 Comments