google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह तीन ठार : पुणे-बंगळुरू महामार्गावरील पाचवड फाटा घटना

Breaking News

भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह तीन ठार : पुणे-बंगळुरू महामार्गावरील पाचवड फाटा घटना

   भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह तीन ठार :


पुणे-बंगळुरू महामार्गावरील पाचवड फाटा घटना

कराड : रस्त्यावरती उभ्या असलेल्या ट्रकला मोटारकारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथील भाग्यलक्ष्मी हॉटेलसमोर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

या अपघातामध्ये नितीन बापूसाहेब पोवार (३४), मनीषा अप्पासाहेब जाधव (३६) व अभिषेक अप्पासाहेब जाधव (२४, तिघेही रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. नितीन पोवार हे कोल्हापूर येथील राजवाडा पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आहेत. 

कोल्हापूरकडून कराडबाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Post a Comment

0 Comments