सांगोला तालुक्यात महिम येथे आमदार शहाजीबापू पाटील व माजी
आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन संपन्न
महिम /वार्ताहर (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार सन्माननीय शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने महीम येथील कासाळ ओढ्यावर हरि आप्पा मरगर यांच्या शेताजवळ साडेतीन कोटी रुपये खर्चून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आहे
हा बंधारा निरा-देवधरच्या पाण्याने भरलेला आहे याचे पाणी पूजन मंगळवार दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील व विधानपरिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते व शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे महूद गटाचे नेते संजय मेटकरी अरुण नागणे गणेश लवटे कुंडलिक पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले
यावेळी बोलताना आमदार शाहाजीबापू पाटील म्हणाले की राजकारण करत असताना कायम विकास कामांना महत्त्व देत गेलो मी आणि गणपतराव देशमुख आम्ही दोघे जरी राजकारणात विरोधक असलो तरी विकास कामे मात्र आम्ही मिळून करत होतो
विकास कामाला कोणत्याही अडचणी येऊ दिल्या नाहीत महिम गावासाठी भरपूर प्रमाणात निधी दिलेला आहे आणि अजूनही विकास कामे करणे बाकी आहे त्यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे
कासाळ ओढ्यावर महिम हद्दीत अजून एक बंधारा मंजूर करणार आहे तर महुद बु, येथील ओढ्यावर दोन बंधारे देणार आहे वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते डांबरी केले आहेत महिम गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल
असे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले तर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले की या गावातील शेतीला कायमस्वरूपी हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी प्रयत्न केले होते
आणि महिम गावाला ९५/३ कॅनलचा फाटा काढून पाणी आणले आणि शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन काकासाहेबांनी पूर्ण केले तेव्हा गावातील शेतकऱ्यांनी व माता-भगिनीनी काका साहेबांना आरती ओवाळत औक्षण केले होते व वाजत गाजत गावातून भव्य अशी मिरवणूक काढली होती
महीम हे गाव विकास करणाऱ्या माणसाच्या मागे आहे पूर्वी काकासाहेबांनी लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे पाहायला मिळत आहे गावच्या विकासासाठी मी आणि बापू आम्ही दोघेही प्रयत्नशील राहणार
असल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष दादासो लवटे दिलीप कारंडे सर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी दिगंबर कारंडे नागनाथ लवटे हनुमंत कारंडे सुरेश महापुरे नानासो बंडगर
सुरेश नारनवर बिभिशन पाटील श्रीकांत चौगुले सोमनाथ मरगर मिलन मरगर गणपतराव पाटील प्रकाश कुलकर्णी पांडुरंग कारंडे अंकुश महापुरे राजकुमार मरगर दत्तू घोगरे दिलीप भाऊ मरगर गणेश मरगर निखिल पाटील
बिरू कारंडे शिवाजी गोरवे बंडू कारंडे तुकाराम बंडगर सोमनाथ भुसनर दीपक भुसनर संदीप शेंडे प्रशांत पाटील रवी पाटील नामदेव गोरवे कृष्णा धोत्रे मसु गोरवे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय मरगर यांनी केले


0 Comments