सांगोला तालुक्यात तीव्र विरोध असतानाही अनकढाल पाटी येथील टोल नाक्यावर वसुली जोरात प्रवाशांमधून तक्रारींचा पाऊस :
चांगल्या सुविधा हव्या असतील तर टोल भरावाच लागेल
मात्र टोल भरूनही प्रवाशांना करावा लागतोय अमुविधांचा सामना प्रवाशांमधून तक्रारींचा पाऊस : राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी टोल संदर्भात पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याने पुन्हा टोल वसुलीचा मुद्दा पेटला आहे. यामध्ये येथील सामाजिक कार्यकर्ते नितीनदादा रणदिवे यांनी दुचाकी व लहान गाड्यांची होणारी टोल वसुली थांबवावी
अन्यथा टोलनाका फोडून बंद करू अशी मागणी केल्यानंतर देखील सांगोला मिरजरोडवरील अनकढाळ पाटी येथील टोल यंत्रणेकडून वसुली जोरात सुरू आहे.
दरम्यान अनेकांचा टोल वसुलीला विरोध असताना विरोधाला न जुमानता टोल वसुली जोमाने सुरू आहे. दरम्यान प्रवाशांना प्रवास करताना चांगले रस्ते आणि रस्त्यावर चांगल्या सुविधा हव्या असतील तर टोल भरावाच लागेल,
असे सांगितले जात आहे मात्र टोल भरूनही प्रवाशांना असुविधांचा सामना ही करावा लागत आहे. याबाबत ही प्रवाशातून नाराजीचा सूर आहे.सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर अनकढाळ पाटी येथे रस्त्याचे काम झाल्यापासून टोलनाका सुरू आहे.
या टोल नाक्यावरून लहान वाहनांना देखील टोल आकाराला जात असल्याने येथील सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यामधून तीव्र विरोध आहे. टोलनाक्या जवळच्या लोकांना देखील टूल आकाराच्या तक्रारी येथील नागरिकांनी केल्या होत्या.
विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संघटना व जवळच्या लोकांनी तक्रारी करून देखील या तक्रारीला न जुमानता टोल नाक्यावरून टोल वसुली जोमातसुरू आहे. येत्या १५ तारखेपर्यंत सदरची टोल वसुली बंद करावी असा इशारा देण्यात आला असला तरी, अद्याप टोल वसुली सुरूच आहे.
सांगोला मिरज राष्ट्रीय महामार्गावर तसेच अनकढाळ पाटी येथील टोल नाक्यावर गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागत आहे.
प्रवाशांना प्रवास करताना चांगले रस्ते आणि रस्त्यावर चांगल्या सुविधा हव्या असतील तर टोल भरावाच लागेल, असे सांगितले जात आहे मात्र टोल भरूनही प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छता सुरू असले तरी स्वच्छता ग्रहांमध्ये पाणी नाही. तसेच स्वच्छतेचा अभाव आहे. एक ना अशा अनेक तक्रारी प्रवाशांमधून व्यक्तहोताना दिसून येत आहेत.
केवळ नावापुरते स्वच्छतागृह उभारण्यात आले असून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागते. पुरुष प्रवाशांना याठिकाणी अनेकदा वाहने थांबवून नैसर्गिक विधीसाठी उगड्यावर जावे लागते.
विशेषतःरात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होते. याकडे टोल वसुली धारक सरळ सरळ दुर्लक्ष करत आहेत. टोल वसुली जोरात सुरू अन सुविधा नाहीत त्यामुळे प्रवासी वर्गातून देखील संताप व्यक्त केला जात आहे.
सांगोला मिरज रोडवरील अनकढाळ पाटी येथे सुरू असलेल्या टोल नाक्यावर कार साठी एकल १०५ व वापसी १५५ रू. श्रेणी २ पीकअप - टेम्पो करिता एकल १७० व वापसी २५५ रू. श्रेणी ३ साठी एसटी स्कूल बस, टेम्पो याकरिता
एकल ३५५ व वापसी ५३० रू. श्रेणी ४ करिता ६ चाकी वाहन एकल ३८५ ५५५ वापसी ५८०- ८३० रू. श्रेणी ५ करिता एकल - ६७५ वापसी १ हजार १० रू. आकारले जातात.
हा वाढीव दर वाहनधारकांना न परवडणार आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच निर्णय घेईल.
मा. अनिल केदार
तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना


0 Comments