google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! पंढरपुरात तरूणाची हत्या खळबळजनक घटना

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! पंढरपुरात तरूणाची हत्या खळबळजनक घटना

 ब्रेकिंग न्यूज! पंढरपुरात तरूणाची हत्या खळबळजनक घटना


सोलापूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एका तरूणाची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून तो गुरसाळे बंधाऱ्यात फेकून 

दिल्याची घटना आज सकाळी घडली आहे. पंढरपुरात सदरची खळबळजनक घटना घडली आहे. पंढरपूरमधील स्थानिक नागरिकांना आज सकाळी 

गुरसाळे येथील बंधाऱ्यात पोत्याचे गाठोडे तरंगत असल्याचे दिसून आले. दरम्यान याबाबतची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना देण्यात आली. 

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, पोत्यात अंदाजे ३० वर्षं वयाच्या तरूणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या 

सदर घटनेची दखल घेवून वेगाने तपास सुरू केला आहे. तरुणाचे नाव, गाव अद्याप निष्पन्न झाले‌ नाही. 

दरम्यान, या प्रकरणाचा लवकरच तपास लागेल, अशी‌ माहिती पोलिस निरीक्षक मिलींद पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments